ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Weather Forecast 2023 | शेतकऱ्यांच्या पिकाला धोका! पुढचे ‘इतके’ दिवस राज्याला सडकणार अवकाळी पाऊस, हवामान विभागाचा इशारा

Weather Forecast 2023 | होळीपासून हवामानात सतत बदल होत आहेत. होळीपूर्वी जिथे नागरिकांना अचानक उकाड्याचा सामना करावा लागत होता. आता रिमझिम पाऊस सुरू झाल्याने वातावरण आल्हाददायक झाले आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने (Weather Forecast 2023) पुढील 5 दिवसांचे मोठे अपडेट जारी केले आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडू शकते. चला तर मग हवामान विभागाने (Weather Forcast 2023) पुढच्या पाच दिवसांसाठी काय इशारा दिला आहे ते जाणून घेऊया.

कोणकोणत्या राज्यांत पडणार पाऊस?
तापमान वेगाने वाढत आहे. मात्र, येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने सांगितले की, शनिवारी (11 मार्च) अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील लोकांना उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळू शकतो. तर शेतकऱ्यांच्या पिकाला या पावसाचा मोठा फटका बसू शकतो.

हवामान कसे असेल?
हवामानाच्या ताज्या अपडेटनुसार आज वातावरण काहीसे उष्ण असेल. दिवसभर आकाश निरभ्र राहील आणि तेजस्वी सूर्यप्रकाश असेल. लोकांना उष्णतेच्या लाटेचाही सामना करावा लागू शकतो. तर या उष्णतेमुळे पावसाची शक्यता आहे. मागच्या आठवड्यात होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. याची पाहणी पूर्णपणे होण्यापूर्वीच आता पुन्हा एकदा हवामान विभागाने राज्यातमध्ये पुढचे पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची योग्य ती काळजी घ्यावी, पिकाला पाणी जास्त प्रमाणात पाणी देऊ नये, तसेच शेतमाल व्यवस्थित ठेवावा.

उष्णतेची लाट कुठे येईल?
हवामान खात्यानुसार दक्षिण भारतातील काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. आज कोस्टल कर्नाटक, कोकण आणि गोव्यातील लोकांना उष्णतेच्या लाटेमुळे खूप त्रास होऊ शकतो. उष्णतेच्या लाटेमुळे या भागातील तापमानही वर जाऊ शकते. मात्र, येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता असून, त्यामुळे तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

हेही वाचा:

ब्रेकिंग! गोपिनाथ मुंडे अपघाती विमा योजनेतील लाभार्थी कुटुंबांना ’इतक्या’ कोटींचा निधी मंजूर

शनीचा नक्षत्रात होणारं प्रवेश! ‘या’ राशींना लागणारं लॉटरी, पूर्ण 7 महिने होणारं चांदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button