ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता तुम्हीही पीएम किसान योजनेची घरबसल्या ‘या’ ॲपद्वारे करू शकता नोंदणी

शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना (PM Kisan Sanman Yojna) ही अत्यंत उपयुक्त योजना आहे. या योजनेला आता जवळपास ६ वर्षे इतका कालावधी पूर्ण होत आला आहे. या ६ वर्षांनंतर यामध्ये अपडेट करण्यात आली आहे. ११ व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना ई- केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नाही. त्याच्यासाठी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे. पूर्वी पीएम किसान योजनेची नोंदणी करण्याकरिता सीएस केंद्रावर जावे लागत होते. मात्र, आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता पीएम किसान योजनेची नोंदणी घरबसल्या करता येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया घरबसल्या ही नोंदणी कशी करता येईल.

‘या’ ॲपद्वारे घरबसल्या नोंदणी

पीएम किसान योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठी केंद्राद्वारे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अनेक शेतकऱ्यांना केंद्रात जाऊन नोंदणी करणे शक्य नसल्याने अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नव्हते. आता या शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे नोंदणी करता येणार आहे.

मोबाईलद्वारे कशी कराल नोंदणी?

केंद्राने आता जीओआय (GOI) हे मोबाईल अॅप चालू केले आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय माहिती केंद्राने हे मोबाइल अॅप विकसित केले आहे. या हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन पीएम किसान जीओआय (GOI) ॲप (PM Kisan GOI App) डाऊनलोड करावे.

त्यानंतर अॅपवर ‘न्यू फार्मर रजिस्ट्रेशन’ करावे. त्यामध्ये आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा. त्यानंतर अर्जात सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज सबमिट करावा. योजनेची माहिती पंतप्रधान किसानच्या हेल्पलाइन नंबर 155261 मिळेल. 011-24300606 या नंबरवरून देखील माहिती मिळेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button