ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Fodder Urea treatment| चारा पिकावर युरिया चा उपचार करा आणि त्याची पौष्टिकता वाढवा!
जाणून घ्या खाली सविस्तर माहिती..

Need of Treatment|उपचाराची गरज : दुष्काळी भागात पाण्याची अतिशय कमतरता असते त्यामुळे हिरवा चारा मिळणे अवघड होत असते. अशा वेळी जनावरांना वाळलेल्या चारण वरती राहावे लागते. सध्या चार्याची किंमत सुद्धा जास्त आहे त्यामुळे शेतकऱ्यांना लाभदायक होत नाही.पशुपालक जनावरांच्या आहारात दुय्यम घटकांचा (उदा. गव्हाचा पेंढा, भात पेंढा) जास्त वापर करतात. त्यामुळे आहाराची पौष्टिकता वाढवण्यासाठी युरिया प्रक्रिया महत्त्वाची आहे.


पिकांचे निकृष्ट अवशेष सकस करण्यासाठी युरिया प्रक्रिया :
शेतातील पिकांचे अवशेष हे सर्रास जनावरांना खाऊ घातले जातात किंवा जाळून टाकले जातात. त्यात प्रथिनांचे प्रमाण कमी असते आणि न पचणाऱ्या तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असते. असा चारा पौष्टिक नसतो व पचनासही अवघड असतो. अश्या निकृष्ट चाऱ्यावर साठवताना युरिया व गुळाची प्रक्रिया केल्यास चाऱ्याचा सकसपणा व पचनियता वाढविता येते.

वाचा- Drenching In Agriculture| भाजीपाल्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी आळवणी कशी उपयुक्त आहे नक्की वाचा.

Ingredients required for Treatment |प्रक्रिया साठी लागणारी सामग्री :

वाळलेला चारा(उदा. गव्हाचे काड, गवत, भाताचा पेंढा -100 कि.ग्रॅ.
युरिया ( Urea) -2 kg
गुळ (Jaggery) -1 kg
क्षार मिश्रण -1 kg
खडे मीठ -1 kg
पाणी -20 lit

प्रक्रियेची कृती :
वाळलेल्या चाऱ्याची कुट्टी करून घ्यावी. शंभर किलो चाऱ्यासाठी 2 किलो युरिया 20 लिटर पाण्यात विरघळून घ्यावा. तयार झालेल्या मिश्रणात १ किलो मीठ व 1 किलो गुळ मिसळून एकजीव करावे. फरशीवर किंवा टणक जागेवर चाऱ्याच्या कुट्टीचा थर पसरवून त्यावर हे द्रावण शिंपडवून त्यावर क्षार मिश्रण टाकावे. कुट्टी वर खाली करून चांगले मिसळावे. कुट्टीचा असा मिसळलेला थरावर थर देवून व्यवस्थित दाबून त्यातील हवा बाहेर काढून टाकावी त्यावर प्लास्टिकचा कागद झाकून हवाबंद करावे. एकदा हवाबंद केलेला ढीग 21 दिवस हलवू किंवा उघडू नये.त्यानंतर वैरण सोनेरी पिवळ्या रंगाची होऊन खाण्यास योग्य अशी तयार होते.

Benefits of fodder treatment|प्रक्रिया केलेली वैरण वापरण्याचे फायदे :

•चाऱ्यावरील खर्चात बचत: एका मोठ्या जनावरास दिवसात 3 ते 4 किलो वाळलेला चारा आवश्यक असतो. त्यामुळे वाया जाणाऱ्या निकृष्ट चाऱ्यातून हा पौष्टिक चारा जनावरांना मिळाल्याने कडब्यावरील खर्चात बचत होते.
•दुध उत्पादनात वाढ: प्रक्रिया केलेले काड तुलनेने जास्त पौष्टिक असते, त्यात 8 ते 9 % प्रथिने तर 50-60% पर्यंत पचनीय पदार्थ असतात. यामुळे जनावारचे दुध वाढण्यास मदत होते.
• जनावरांचे आरोग्य चांगले राहते.

ऋतुजा ल. निकम ( MBA AGRI)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button