ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Tur Price Hike | बाजारात तूरीला का आलाय एवढा भाव, जाणून घ्या काय आहे कारण?

भारतीय लोकांच्या आहारात वापरली जाणारी तूर ही बाजारात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. खरीप हंगामातील (Kharif season) महत्वाच्या पिकांमध्ये तुरीचा (Tur) समावेश होतो.

Tur Price Hike | जून ते जुलैच्या दरम्यान हे पीक घेतले जाते. स्वयंपाकात (Cooking) जास्तीत जास्त तुरीचा वापर केला जातो. तूर डाळीचे (Tur dal) वरण तुम्ही रोज भाताबरोबर खाता. रोजच्या आहारातील ही तूरडाळ आता खरेदी केंद्रावर (Turdal Shopping Center) चांगलाच भाव खात आहे. बाजारात 7 हजार प्रतिक्विंटल तर खरेदी केंद्रावर 6500 असा तुरीचा भाव सध्या पहायला मिळत आहे.

का आला तुरीला भाव?
अनेक ठिकाणी मान्सून बरसला असला तरी अद्याप काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली नाही. याचा परिणाम म्हणून तुरीच्या पेरण्या रखडल्या गेल्या. नैसर्गिक आपत्तीचा (natural disaster) सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना 2021 पासून त्याच्या पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. काही वर्षांपूवी तुरीच्या उत्पादनात घट झाल्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना तुरीचे उत्पादन घेण्यासाठी आव्हान केले. त्यावेळेस तुरीची अवाक वाढली आणि शेतकऱ्यांना हवा तो भाव (rate) सरकारकडून मिळाला नाही. यापूर्वीही कापूस (cotten) सोयाबीन (soyabean) यासारख्या पिकांचे भाव पडले गेले होते. परंतु काही महिन्यांपासून ही परिस्थिती बदललेली दिसून येते आहे. तुरीच्या उत्पादनात घट झाल्यामुळे तुरीला चांगला बाजार भाव मिळत आहे.

वाचा: Rose Farming | काय सांगता? गुलाबापासून बनतात ‘ही’ उत्पादने, शेतकरी थेट 10 वर्ष कमवू शकतात नफा

काय आहेत सध्या वेगवेगळ्या जिल्ह्यात तुरीचे भाव?
वाशीम(6755), सोलापूर(6455),परभणी(5700),उस्मानाबाद (6375), नाशिक (5452),नांदेड (6003), नागपूर(5660), जालना (6275), बीड(6458),अमरावती (6531), लातूर (6550), अकोला (6640), औरंगाबाद(6501).

वाचा: Wheat | तब्बल 8 हजार रुपये क्विंटलने विकला जातोय ‘हा’ गहू, शेतकऱ्यांनो मालामाल होण्यासाठी हा गहू पिकवाचं…

शेतकऱ्यांची तूर विक्री खुल्या बाजारात करायला पसंती
कापसापाठोपाठ तुरीला चांगला दर मिळत मिळत असल्याने शेतकरी सध्या समाधानी आहे.परंतु राज्यात अनेक ठिकाणी तूर हमी केंद्रे सुरू झाल्यामुळे आणि 1 महिन्यानंतर खात्यात पैसे येत असल्याने शेतकरी सरकारपेक्षा खुल्या बाजारात तूर विक्री करण्यास पसंती देत आहे. कृषी बाजार समित्यांमध्ये सरकारपेक्षा तुरीची आवक जास्त दिसत आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button