ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Today’s Weather Update | राज्यात पुढचे पाच दिवस बरसणार मुसळधार पाऊस! ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी, जाणून घ्या किती पडेल?

Today’s Weather Update | राज्यात यंदाचा मान्सून हा उशिरा दाखला झाला असून अनेक ठिकाणी अजूनही समाधानकारक असा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकरी आणि नागरिक पावसाची मोठ्या उत्साहाने वाट पाहत आहेत. अशातच आता राज्यामध्ये पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस (Today’s Weather Update) पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. चला तर मग जाणून घेऊयात हवामान विभागाने राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

कोणत्या जिल्ह्यांमध्ये पडणार पाऊस?

मुंबई शहरातील कुलाबा येथील प्रादेशिक हवामान विभागाने पुढील 5 दिवस राज्यात मान्सून बहुतांश जिल्ह्यांमध्ये सक्रिय असण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ इत्यादी जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे हवामान विभागाने या जिल्ह्यांना पुढील पाच दिवस येलो अलर्ट जारी केला आहे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

किती प्रमाणात पडेल पाऊस?

तसेच, मुंबई, ठाणे, अहमदनगर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड आणि लातूर इत्यादी जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, कोकण आणि घाटमाथ्यावर सातत्याने पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे येथील धबधबे सक्रिय झाले असून पर्यटकांसाठी हे आकर्षक ठिकाण ठरत आहे. राज्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीला वेग आला आहे.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Web Title: Heavy rain will rain in the state for the next five days! Alert issued to these districts, know in detail…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button