ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Today’s Weather Update | शेतकऱ्यांनो राज्यात जोरदार पावसाच्या बरसणार सरी, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

Today’s Weather Update | देशात यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे शेतकरी हैराण झाला असताना शेतकरी पाऊसाची आस लावून बसले आहेत. मात्र, आता पावसाची प्रतीक्षा संपलेली असून राज्यामध्ये मान्सून सक्रिय झाला आहे. दरम्यान, आज कोकण विभाग आणि घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच, हवामानातील (Today’s Weather Update) बदलांमुळे उर्वरित राज्यातील काही भागांमध्ये हलक्या सरी बरसण्याचा अंदाजही वर्तवला आहे.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी


खरं तर, राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे, तापमानात देखील कमालीची घट निर्माण झाली आहे. रायगड, पालघर, ठाणे, पुणे, सातारा, रत्नागिरी आणि नाशिक इत्यादी जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. तसेच, मुंबई, सिंधुदुर्ग, जळगाव, नंदुरबार, कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट जारी केलेला आहे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

अरबी समुद्रामध्ये चक्राकार वाऱ्यांचा वेग सक्रिय झाला असल्यामुळे केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. 27 जून नंतर कोकण आणि घाट परिसरातील विभागांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असल्यामुळे सातत्याने या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे. त्यामुळे, आता पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून लवकरच संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे. तसेच, लवकरच पंजाब, हरियाणा आणि राजस्थान राज्यांमध्येही पावसाचे आगमन होणार आहे.

Web Title: Farmers, there will be heavy rains in the state, orange alert has been issued for these districts

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button