ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Agricultural Advisory | पुढचे पाच दिवस कसे राहील वातावरण? कशी घ्यावी पिकाची काळजी अन् कशी करावीत शेती कामे? जाणून घ्या सविस्तर

Agricultural Advisory | पुढचे पाच दिवस कसे राहील वातावरण? कशी घ्यावी पिकाची काळजी अन् कशी करावीत शेती कामे? जाणून घ्या सविस्तर

Agricultural Advisory | भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस १२ ते १६ ऑगस्ट २०२३ दरम्यान आकाश आंशिक ढगाळ ते मुख्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. १२, १३ आणि १४ ऑगस्ट २०२३ रोजी दरम्यान तुरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे. तर १५ आणि १६ ऑगस्ट २०२३ रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता तर कमाल व किमान तापमान सरासरी एवढे राहील. शेतकरी मित्रांनो चला तर मग तुमच्या पिकाची कशी काळजी घ्यावी याबाबत कृषी सल्ला (Agricultural Advisory) जाणून घेऊयात.

वाचा : Agricultural Advisory | शेतकऱ्यांनो पुढील पाच दिवस तुरळक प्रमाणात पडेल पाऊस; जाणून घ्या शेतीची कोणती कामे करणे योग्य?

Agricultural Advisory | कृषी सल्ला

  • आंतरमशागतीची कामे (खुरपणी/डवरणी), कृषी रसायनांच्या (कीटकनाशके, बुरशीनाशके इत्यादी) फवारणीची कामे आणि उभ्या पिकांमध्ये खते देण्याची कामे पुढील ५ दिवस सुरु ठेवावी.
  • शेतकरी बांधवांनी कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव जाणण्यासाठी पिकाचे नियमित निरीक्षण करावे तसेच शिफारशीनुसार पिक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये नियंत्रणाच्या उपाययोजनाचा अवलंब करावा.
  • विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता गाय,
    म्हैस, शेळ्या, मेंढ्याव इतर पाळीव जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे.
  • जनावरे हे खुल्या पाण्याचे स्त्रोत, नदी किंवा तलाव व ट्रक्टर व इतर धातूच्या अवजारांपासून दूर ठेवावे. स्थानिक हवामान अंदाज व सूचना यांचा अंदाज घेऊनच शेती कामाचे नियोजन करावे.
  • पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता, शेतकरी व शेतमजूर यांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.
  • शेतातील अति महत्वाची कामे शक्यतो सकाळच्या वेळी उरकून घेण्याला प्राधान्य द्यावे.
  • शेतमजुरांना शेतामध्ये एकत्रित समूहाने काम करू न देता दोन व्यक्तीमध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवावे.
  • शेतात आसरा घेताना पाण्याचे स्त्रोत (विहीर, तलाव, नदी इत्यादी), उंच ठिकाणे (झाडे, उंचवटे), धातूचे अवजारे या पासून जास्तीत जास्त अंतरावर आसरा घ्यावा.
  • शेतकरी व शेतमजूर यांनी झाडाखाली आसरा घेणे टाळावे तसेच जनावरांचा झाडाखाली आश्रय टाळावा.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: How will the weather be for the next five days? How to take care of the crop and how to do agricultural work? Know in detail

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button