ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Land | जमीन खरेदी करताना घ्यावी ‘ही’ काळजी, जाणून घ्या सविस्तर…

Land | शेतकरी किंवा सामान्य व्यक्ती नवीन जमिनीची खरेदी करतात. मात्र, अनेकदा नवीन व्यक्तींना किंवा शेतकऱ्यांना जमिनीची खरेदी (Purchase of land) करताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल माहिती नसते. यामुळे शेतकरी फसवणुकीला बळी पडतात. जमिनीची (Agriculture) खरेदी करताना मध्यस्थी लोक अशिक्षित लोकांचा गैरफायदा घेत फसवणूक करतात. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक (Financial) तोटा होतो. चला तर मग जाणून घेऊयात जमीन (Land) खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी.

सातबारा व फेरफार उतारा
शेतकऱ्यांनी जमिनीची खरेदी करताना सातबारा उतारा आणि फेरफार उतारा नीट काळजीपूर्वक पाहणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी ज्या गावात त्यांना जमीन खरेदी करायची आहे त्या गावातील तलाठ्याकडून जमीनीचा सातबारा काढून घ्यावा. तसेच फेरफार आणि आठ-अ उतारे तपासून घेणे गरजेचे आहे. यावर जमीन विक्रेत्यांचे नाव आहे का, जमिनीवर कर्जाचा बोजा आहे का, कोणता केस खटला चालू आहे का? या सर्व गोष्टी तपासणे महत्त्वाचे आहे.

वाचा: शेतकऱ्यांनो दिवसाला 45 रुपये वाचवा अन् 25 लाखांचे व्हा मालक, एलआयसीची ‘ही’ योजना देतेय सुवर्णसंधी

भुधारणा पद्धत
जमिनीची खरेदी केल्यानंतर किंवा त्यापूर्वी सातबारा उतारा तुमच्या हातात आला की, त्यानंतर तात्काळ सदर जमीन भूधारणा पद्धतीअंतर्गत येते हे जाणून घ्यावे. या सातबारा उताऱ्यावर भोगवटादार वर्ग-1 पद्धत असेल, तर भोगवटादार वर्ग-1 या पद्धतीमध्ये अशा जमिनी येत असतात. अशा जमिनींवर हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात म्हणजेच शेतकरीच या जमिनीचा मालक असतो.

जमिनीचा गट नकाशा
जमीनीची खरेदी करताना जमिनीचा गट नकाशा पाहणे गरजेचे आहे. कारण जमिनीचा गट नकाशा पाहिल्यामुळे जमिनीची हद्द समजते. तसेच जमिनीची चतु:सीमा समजते. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जमिनीच्या चारही बाजूंना कोणते गट नंबर आहेत याची माहिती देखील मिळते.

वाचा: गायीची दूध उत्पादन क्षमता घटलीये? तर नफा आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

शेतीचा रस्ता
सर्वात महत्त्वाची आणि जमीन खरेदी केल्यानंतरची कायमची असणारी कटकट म्हणजेच शेत जमिनीचा रस्ता. कारण जमिनीच्या रस्त्यावरून किती वाद होतात ही गोष्ट सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनीची खरेदी करण्यापूर्वी शेत रस्ता आहे की, नाही याची खात्री करावी.

खरेदी खत
जमीन खरेदी केल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जमिनीचे खरेदी खत. यासाठी शेतकऱ्यांनी तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी आणि त्यानंतर आवश्यक शुल्क भरून खरेदी खत करावे. ज्यात गट नंबर, मूळ मालकाचं नाव, चतु:सीमा, क्षेत्र बरोबर आहे की, नाही याची सविस्तर तपासणी करून घ्यावी. या सर्व गोष्टींची शेतकऱ्यांनी काळजी घेऊन जमिनीची खरेदी करावी. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: This care to be taken while buying land, know in detail

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button