ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Agricultural Advisory | शेतकऱ्यांनो पुढील पाच दिवस तुरळक प्रमाणात पडेल पाऊस; जाणून घ्या शेतीची कोणती कामे करणे योग्य?

Web Title: Farmers will receive sporadic rain for the next five days; Know what agricultural activities are appropriate to do

Agricultural Advisory | भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस दिनांक 9 ते 13 ऑगस्ट दरम्यान आकाश आंशिक ढगाळ ते मुख्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिनांक ते 13 ऑगस्ट दरम्यान तुरळक (एक ते दोन) ठिकाणी खूप हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. विस्तारित स्वरूपाच्या अंदाज प्रणालीनुसार विदर्भामध्ये दिनांक 13 ते 19 ऑगस्ट या आठवड्यामध्ये पाऊस हा सरासरी एवढा राहण्याची शक्यता तर कमाल व किमान तापमान सरासरी एवढे राहील. शेतकरी मित्रांनो चला तर मग तुम्ही या पाच दिवसांत कोणती कामे करू शकता ते कृषी सल्ल्यानुसार (Agricultural Advisory) जाणून घेऊयात.

कृषि सल्ला
आंतरमशागतीची कामे (खुरपणी/डवरणी), कृषी रसायनांच्या (कीटकनाशके, बुरशीनाशके इत्यादी) फवारणीची कामे आणि उभ्या पिकांमध्ये खते देण्याची कामे पुढील 5 दिवस सुरु ठेवावी. शेतकरी बांधवांनी कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव जाणण्यासाठी पिकाचे नियमित निरीक्षण करावे. तसेच शिफारशीनुसार पिक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये नियंत्रणाच्या उपाययोजनाचा अवलंब करावा.

वाचा: Agricultural Advisory | राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान आधारित कृषी सल्ला

संक्षिप्त कृषी सल्ला
आंतरमशागतीची कामे (खुरपणी/डवरणी), कृषी रसायनांच्या (कीटकनाशके, बुरशीनाशके इत्यादी) फवारणीची कामे आणि उभ्या पिकांमध्ये खते देण्याची कामे पुढील 5 दिवस सुरु ठेवावी.

कपाशी
आंतरमशागतीची कामे (खुरपणी/डवरणी), कृषी रसायनांच्या (कीटकनाशके, बुरशीनाशके इत्यादी) फवारणीची कामे आणि उभ्या पिकांमध्ये खते देण्याची कामे पुढील 5 दिवस सुरु ठेवावी. प्रभावी तन व्यवस्थापनासाठी तन 2 ते 3 पानावर असताना तन नाशकाचा वापर करावा.

सोयाबीन
आंतरमशागतीची कामे (खुरपणी/डवरणी), कृषी रसायनांच्या (कीटकनाशके, बुरशीनाशके इत्यादी)
फवारणी ची कामेआणि उभ्या पिकांमध्ये खते देण्याची कामे पुढील 5 दिवस सुरु ठेवावी. सोयाबीन पिकाचे नियमित अंतराने निरीक्षण करावे वअँथ्रॅकनोज प्रादुर्भाव दिसून आल्यास टेबूकोनाझोल 25.9 ईसी (625 मिली/हेक्टर) किंवा टेबूकोनाझोल 10% + सल्फर 65% डब्ल्यूजी (1250 ग्राम/हेक्टर) या प्रमाणात शांत व स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Farmers will receive sporadic rain for the next five days; Know what agricultural activities are appropriate to do

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button