ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Agricultural Advice | शेतकऱ्यांनो पुढचे पाच दिवस राज्यात पाऊसधारा; जाणून घ्या कशी घ्यावी पिकाची काळजी अन् खुरपणी

Agricultural Advice | भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस दिनांक २ ते ६ ऑगस्ट २०२३ दरम्यान आकाश आंशिक ढगाळ ते मुख्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिनांक ५ ऑगस्ट २०२३ रोजी सर्वत्र ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Agricultural Advice) होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर पिक कसे सांभाळावे खुरपणी कधी करावी ते जाणून घेऊयात.

कपाशी
डवरणी आणि खुरपनीची कामे शक्यतो सकाळच्या वेळी करावी. प्रभावी तन व्यवस्थापनासाठी तन २ ते ३ पानावर असताना तन नाशकाचा वापर करावा. पिक उगवणीनंतर तन व्यवस्थापनासाठी, रुंद पानाच्या तन नियंत्रणासाठी पायरिथिओबॅक सोडियम १० % ईसी १२.५ मिली ते १५ मिली प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ५% ईसी १५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना स्वच्छ व शांत हवामान परिस्थिती असताना सध्याच्या पावसाच्या उघाडीनंतर फवारणी करावी.

वाचाEye Infection| बाप रे! वाऱ्यासारखा पसरतोय डोळ्यांचा ‘हा’ आजार; हजारो नागरिक झालेत आजाराने त्रस्त, जाणून घ्या लक्षणे

सोयाबीन
सोयाबीन पिकाचे नियमित अंतराने निरीक्षण करावे वअँथ्रॅकनोजप्रादुर्भाव दिसून आल्यास टेबूकोनाझोल २५.९ ईसी (६२५ मिली/हेक्टर) किंवा टेबूकोनाझोल १० % + सल्फर ६५ % डब्ल्यूजी (१२५० ग्राम/हेक्टर) या प्रमाणात शांत व स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. शेतकरी बांधवांनी सोयाबीन पिकामध्ये नियमित अंतराने शेताच्या ३ ते ४ ठिकाणी कीड/अळी चा प्रादुर्भाव तसेच त्यांच्या अवस्था या बाबतीत निरीक्षण करावे. यामुळे कीड नियंत्रणाचे उपाय राबविण्यासाठी मदत होईल.

तूर
तण व्यवस्थापनासाठी आणि जमीन व पिकामध्ये हवा खेळती राहण्यासाठी स्वच्छ हवामान आणि वाफसा परिस्थितीमध्ये आंतरमशागतीची कामे (खुरपणी/डवरणी) करावी.

मुग
तण व्यवस्थापनासाठी आणि जमीन व पिकामध्ये हवा खेळती राहण्यासाठी स्वच्छ हवामान आणि वाफसा परिस्थितीमध्ये आंतरमशागतीची कामे (खुरपणी/डवरणी) करावी.

उडीद
तण व्यवस्थापनासाठी आणि जमीन व पिकामध्ये हवा खेळती राहण्यासाठी स्वच्छ हवामान आणि वाफसा परिस्थितीमध्ये आंतरमशागतीची कामे (खुरपणी/डवरणी) करावी.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Farmers predict the next five rains; Know how to take care of the crop and weeding

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button