ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

Ration Card | रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! केंद्र सरकारने घेतला ‘हा’ निर्णय; होणार मोठा फायदा

Ration Card | जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही सरकारकडून रेशन (Ration Card) घेत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रेशन घेणार्‍या लाभार्थ्यांना (Financial) लक्षात घेऊन सरकारने काही महत्त्वाचे नियम बनवले आहेत आणि त्यांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. याअंतर्गत रेशन (Ration Card Rules) वितरणात घोटाळा करणाऱ्या व्यापाऱ्यांना लगाम बसणार आहे.

रेशनच्या वजनात अनियमितता असल्याच्या अनेक तक्रारी ग्राहकांकडून आल्या होत्या, त्यानंतर सरकारने (Agri News) आता रेशन दुकानांवर इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल लावणे बंधनकारक केले आहे. आता कोणताही रेशन विक्रेता इलेक्ट्रॉनिक पॉईंटशिवाय सरकारी रेशन दुकानावर रेशन विकू शकणार नाही. या माध्यमातून रेशन वितरणाची प्रक्रिया सुलभ करण्यात येत आहे.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! महाराष्ट्रातील तब्बल 16 लाख शेतकऱ्यांना ‘इतक्या’ कोटींची नुकसान भरपाई

सरकारी रेशन दुकानांसाठी नवीन नियम आला सरकारी रेशन घेणार्‍या लोकांना योग्य प्रमाणात रेशन मिळावे यासाठी केंद्र सरकारने (Department of Agriculture) राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत रेशन दुकानांवर इलेक्ट्रॉनिक स्केल (ईपीओएस) स्थापित केले आहेत. रेशन दुकानांमध्ये पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने सरकारने हा नवा नियम लागू केला आहे. विशेष म्हणजे कमी वजनाच्या प्रकरणांबाबत ग्राहकांकडून अनेक तक्रारी आल्या होत्या.

नवीन नियमाच्या तरतुदी काय आहेत
केंद्र सरकारने लक्ष्य सार्वजनिक वितरण प्रणाली (TPDS) चालविण्यासाठी कायद्याच्या कलम 12 अंतर्गत रेशनच्या वजनात सुधारणा केली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) द्वारे, सरकार देशातील सुमारे 80 कोटी लोकांना प्रति व्यक्ती 5 किलो गहू आणि तांदूळ प्रति किलो 2 ते 3 रुपये अनुदानित दराने देत आहे.

वाचा: पुन्हा सोयाबीन उत्पादकांवर वाईट दिवस! बाजारात ‘इतक्या’ रुपयांनी नरमले दर, जाणून घ्या कारण?

नियमांमध्ये बदल
इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल अंतर्गत नवीन नियम लागू केल्यामुळे रेशन वितरणात पारदर्शकता येणार आहे. तसेच, एका सरकारी अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की रेशन डीलर्सना EPOS द्वारे रेशन देण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, सरकार त्यांना प्रति क्विंटल 17 रुपये अतिरिक्त नफा देईल. यामुळे त्यांना EPOS द्वारे रेशन देण्यास प्रवृत्त केले जाईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button