ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

मोठी बातमी; खरीप हंगाम २०२१-२२ ची अंतिम पैसेवारी जाहीर, या 8 जिल्ह्यातील शेतकरी आहेत लाभार्थी…

The final percentage of kharif season 2021-22 has been announced. There are farmers in these 8 districts

खरीप हंगाम २०२१-२२ ची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. सरसकट पीक विमा देताना तसेच नुकसान भरपाई देताना पैसेवारी काढली जाते. पैसेवारीच्या आधारावर त्या मंडळाचे नुकसान ग्राह्य धरून पीक विम्यासाठी ही मंडळे ग्राह्य धरले जातात. पूर्व नियोजित पैसेवारी सप्टेंबर महिन्यात जाहीर केलेली असते व अंतिम जी पैसेवारी असते ती १५ डिसेंबर नंतर जाहीर केली जाते. व ही अंतिम पैसेवारी जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे.

वाचा –

खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर झाली असून ५० पैशा पेक्षा कमी पैसेवारी असणारे जिल्हे आता नुकसान भरपाईस पात्र असणार आहेत.

या जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी जाहीर-

1) वाशिम जिल्हा

यात वाशिम जिल्ह्याच्या सन २०२१-२२ या वर्षातील खरीप हंगामातील प्रमुख पिकांची अंतिम पैसेवारीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यात एकूण ७९३ महसुली गावे असून या ७९३ महसुली गावांची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. वाशिम तालुक्यात लागवडी योग्य असलेल्या गावांची संख्या १३१ असून या सर्व गावांची अंतिम पैसेवारी ४८ पैसे आहे.

मालेगाव तालुक्यातील १२२ गावांची अंतिम पैसेवारी ४७ पैसे, रिसोड तालुक्यातील १०० गावांची अंतिम पैसेवारी ४७ पैसे, मंगरुळपीर तालुक्यातील १३७ गावांची अंतिम पैसेवारी ४८ पैसे, कारंजा तालुक्यातील १६७ गावांची अंतिम पैसेवारी ४८ पैसे मानोरा तालुक्यातील १३६ गावांची अंतिम पैसेवारी ४८ पैसे इतकी आहे.

वाचा –

२) बुलढाणा जिल्हा –

बुलडाणा जिल्हा खरिप हंगाम ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी आली आहे.

जळगाव ४१,

नांदुरा, संग्रामपुर ४५,

बुलडाणा व मलकापूर ४६

चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, मोताळा, खामगाव, शेगाव ४७

देऊळगाव राजा ४८ पैसे आहे.

3) अकोला जिल्हा – (एकुण गाव ९९० , ४७ पैसे)

अकोला गावांची संख्या १८१, ४७ पैसे
अकाेट गावांची संख्या १८५, ४८ पैसे
तेल्हारा गावांची संख्या १०६, ४७ पैसे
बाळापूर गावांची संख्या १०३, ४७ पैसे
पातूर गावांची संख्या ९४, ४८ पैसे
मूर्तिजापूर गावंची sankhya, ४८ paise
बार्शिताकली गावांची संख्या १५७ , ४७ पैसे

4) परभणी जिल्हा

यावप्रमाने परभणी जिल्ह्यातील सर्व ८४८ गावांची अंतिम हंगामी पैसेवारी सरासरी ४७.६० पैसे आली आहे.

परभणी जिल्ह्यात एकूण ८५२ गावे आहेत. बलसा (ता. परभणी) संपूर्ण कृषी क्षेत्र कृषी विद्यापीठासाठी, तर करजखेडा (ता. सेलू), चौधरणी खुर्द (ता. जिंतूर), लिंबाळा (ता. जिंतूर) या गावांचे संपूर्ण कृषी क्षेत्र धरणांसाठी संपादित झाली. त्यामुळे ८४८ गावे पैसेवारीसाठी पात्र आहेत.

5) हिंगोली जिल्हा

हिंगोली जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. यात हिंगोली जिल्ह्यातील ७०७ गावांची पैसेवारी ४५.९९ पैसे आली आहे. हिंगोली जिल्ह्यात ३.९४ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी होती, यात प्रामुख्याने सोयाबीन, त्यापाठोपाठ कापूस तूर मूग उडीद ज्वारी पिकांची पेरणी झाली होती.

6) गडचिरोली जिल्हा

गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६८९ गाव असून यात १५४८ गावात खरिपाची पेरणी होती. यापैकी १२१ गावांची ५० पैसा पेक्षा कमी पैसेवारी लागली आहे तर उर्वरित १३७७ गावात ६१ पैसे पैसेवारी लागली आहे.

7) नांदेड जिल्हा

नांदेड जिल्ह्याचा सुधारित अंदाज ३१ ऑक्टोंबर रोजी जाहीर झाला. यात सर्वच सोळा तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशांच्या खाली जाहीर केली आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशाच्या खाली जाहीर

नांदेड ४७ (गावांची संख्या ८८),
अर्धापूर ४८ ( गावांची संख्या ६४),
कंधार ४७ ( गावांची संख्या १२६),
लोहा ४५ ( गावांची संख्या १२७),
भोकर ४९ ( गावांची संख्या ७७),
मुदखेड ४८ ( गावांची संख्या ५५),
हदगाव ४८ ( गावांची संख्या १३७),
हिमायतनगर ४७ ( गावांची संख्या ६४),
किनवट ४६ ( गावांची संख्या १९१),
माहूर ४६ ( गावांची संख्या ९२),
देगलूर ४८ ( गावांची संख्या १०८),
मुखेड ४८ ( गावांची संख्या १३५),
बिलोली ४८( गावांची संख्या ९१),
नायगाव ४७ ( गावांची संख्या ८९),
धर्माबाद ४८ ( गावांची संख्या ५६),
उमरी ४९ ( गावांची संख्या ६२).

8) गोंदिया जिल्हा

गोंदिया जिल्ह्याची 0.81 पैसे अंतिम पीक आणेवारी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील 955 गावांपैकी एकाही गावांची पैसेवारी 60 पैसेच्या आत नाही. आजघडीला गत वर्षीच्या तुलनेत धान खरेदी कमी असताना प्रशासनाची ही पैसेवारी अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामातील 2 लाख 1 हजार 409 हेक्टर आर लागवड क्षेत्रापैकी 1 लाख 91 हजार 553 हेक्टर क्षेत्रात खरीप हंगामात धानाचे तर उर्वरित क्षेत्रात इतर पिकांची लागवड करण्यात आली होती. सन 2021-22 या वर्षाची खरीप पिकाची अंतिम पैसेवारी जाहीर केली. जिल्ह्यात 955 गावे आहेत. त्यापैकी खरीप पिकांची गावे 919 तर पीक लागवड नसलेली 36 गावे आहेत.
तालुकानिहाय पैसेवारीच्या आकडेवारीमध्ये

गोंदिया 0.95,
गोरेगाव 0.80,
तिरोडा 0.77,
अर्जुनी मोरगाव 0.81,
देवरी 0.90,
आमगाव 0.85,
सालेकसा 0.72,
सडक अर्जुनी 0.64 टक्के पैसेवारी आहे.
जिल्ह्याची हंगामी नजरअंदाज पैसेवारी 0.90 पैसे तर हंगामी सुधारित पैसेवारी 0.88 पैसे होती.

गोंदिया जिल्ह्यातील 72 गावांची पैसेवारी 100 पेक्षा अधिक आहे. यात गोंदिया तालुक्या सर्वाधिक 59 गाव, गोरेगाव तालुक्लुयातील 1 गाव, तिरोडा तालुक्यातील 3, देवरी तालुक्यातील 9 गावांची पैसेवारी शंभरपेक्षा अधिक आहे. अर्जुनी-मोर, आमगाव, सालेकसा आणि सडक अर्जुनी या तालुक्यात एकही गाव 100 पैसेवारीच्या वर नाही.

याच प्रमाणे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील सन.२०२१-२२ यावर्षाची खरीप हंगामातील पीक परिस्थिती दर्शविणारी नजर पैसेवारी ३० सप्टेंबर २०२१ रोजी प्रशासनाने जाहीर केली असून,तालुक्यातील ६९ खरीप व ९५ रब्बी अशा एकूण १६४ गावांची नजर पैसेवारी ५० पैशापेक्षा खाली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button