ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Kharif Season | शेतकऱ्यांनो बोगस बियाण्यांपासून रहा सावध! बियाणे खरेदी करतानाच घ्या ‘अशी’ काळजी

भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशातील जवळपास 65 टक्के नागरिक हा आपला उदरनिर्वाह शेतीवर (Agriculture) करतात.

Kharif Season | सध्या, खरीप हंगाम (Kharif Season) सुरू होणार असून, खरीप पिकांची पेरणी (Sowing of kharif crops) ही जून महिन्याच्या सुरवातीस केली जाते आणि नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये काढली जातील. या खरीप हंगामात प्रामुख्याने तांदूळ, बाजरी, ज्वारी, मका, कापूस, भुईमूग, उडीद, मूग, चवळी, तीळ, तूर, गवार, हरभरा, ऊस, सोयाबीन, भेंडी इत्यादी खरीप पिकांचा समावेश होतो.

बोगस बियाणे
खरीप हंगामात (Kharif) बी-बियाणे (Seeds), खते (Fertilizer), कीटकनाशके (Pesticides) खरेदी करताना शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. बोगस व बेकायदेशीर बियाण्यामुळे शेतीचे व पर्यावरणाचे नुकसान होते. पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार अशा बियाण्याचा वापर व साठवणूक करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे जर असे करताना आढल्यास 5 वर्षाचा कारावास आणि 1 लाख रुपये दंड आकारण्यात येतो. त्यामुळे शासनमान्यता नसलेल्या बियाण्याची लागवड करू नये.

वाचाDrip Irrigation Subsidy | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्य शासनाने ठिबक सिंचन अनुदानात केली तब्बल ‘इतकी’ वाढ

बियाणे खरेदी करतानाच घ्यावी खबरदारी
खरीप हंगाम सुरु झाला की, शेतकऱ्याला या हंगामासाठी लागणारी बी-बियाणे, खते, खरेदी करण्याची धावपळ सुरु होते. या धावपळीमध्येच अनेकवेळा नकळत बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशके वापरली जाऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आणि पैसे खर्च करूनही उत्पादन कमी येते. त्यामुळे उत्पादन वाढीसाठी आणि पेरलेलं उगवण्यासाठी शेतकऱ्यांनी हंगामाच्या सुरवातीपासूनच सतर्क होऊन खत, बी-बियाणे आणि कीटकनाशके खरेदी करताना शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

वाचाVanilla Farming | काय सांगता? ‘या’ शेतीतून मिळतंय लाखोंच उत्पन्न, तब्बल ४० हजार मिळतोय प्रति किलो भाव

शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदी करताना ‘अशी’ घ्यावी काळजी
बियाणे, खते खरेदी अधिकृत परवानाधारक विक्रेत्याकडून करावी. खरेदीवेळी न चुकता पक्के बिल घ्यावे. देयकात पीक, वाण प्लॉट क्र., वजन, अंतिम मुदत, कंपनीचे नाव संपूर्ण नमूद असावे. कृषी केंद्रधारकाने पक्के बिल संपूर्ण विवरणासह न दिल्यास तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समितीच्या कृषी अधिका-याकडे संपर्क साधावा. कापूस बियाणे पाकिटावरील सरकारमान्य चिन्ह तपासावे.

बियाणे, खते खरेदी करताना विक्रेत्याकडून त्याचा परवाना क्रमांक, पूर्ण नाव, पत्ता आणि खरेदी केलेल्या बियाण्याचे नाव, लॉट क्रमांक, वजन, अंतिम मुदत, कंपनीचे नाव याची संपूर्ण माहिती नोंद करून घ्यावी. खरेदी केलेल्या दिवसाचे पक्के स्वरूपातील बिल विक्रेत्याकडून घ्यावे. अनेक बियानांवर सरकारमान्य चिन्ह येत असते ते तपसावे. खरेदी केलेल्या वस्तूची पिशवी सीलबंद आहे की तपसावे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button