ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Silai Machine Subsidy | दिलासादायक; ९० टक्के अनुदानावर ग्रामीण महिला व मुलींना शिलाई मशिन, अर्ज सादर करावयाची ही आहे शेवटची तारीख..

Silai Machine Subsidy | Comfortable; This is the last date for rural women and girls to submit sewing machines and applications on 90% subsidy.

Silai Machine Subsidy | नांदेड जिल्हा परिषदेचे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी इच्छुक लाभार्थ्यांना 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत कार्यालयात अर्ज सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हा अर्ज विहित नमुन्यातील अर्ज असावा.

योजना –

1) ग्रामीण महिलां व मुलींना 90 टक्के अनुदानावर शिलाई मशीन पुरविण्यात येणार.
2) 7 वि ते 1व पर्यंत मुलींना MSCIT प्रशिक्षण देण्यात येणार.

वाचा –जन – धन खातेधारकांसाठी खुशखबर, या खातेधारकांना महिन्याला मिळणार हजारो रुपयांचा लाभ…


3) ग्रामीण महिला व मुलींना शिलाई मशीन चालविण्याचे देखील प्रशिक्षण देण्यात येणार.
4) कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षण तसेच फॅशनचे डिझायनिंग प्रशिक्षण दिले जाणार.

या योजना असणार आहेत. लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावे लागतील. अटी व शर्ती काय असतील? पाहुया सविस्तर…

वाचा –माहीत आहे का?अंक सुद्धा सांगतात भविष्य; ‘या’ तारखेला जन्मलेल्या व्यक्ती च 2022 मध्ये बदलणार भविष्य…

अटी व शर्ती –

1) 15 फेब्रुवारीपर्यत विहित नमुन्यातील अर्ज सादर करा.
2) लाभार्थी नांदेड जिल्ह्यातील राशिवासी असणे गरजेचे आहे.
3) मागासवर्गीय असाल तर जातीचे प्रमाणपत्र असावे.
4) महिला ही दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील किंवा 2020-21 चे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार च्या आत असणे गरजेचे आहे.
5) लाभार्थ्यांकडे शिलाई मशीनचे प्रमाणपत्र असावे.


6) लाभार्थ्यांला 10 टक्के लाभार्थी हिस्सा भरणा करावा लागणार आहे.
7) आधारकार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, वस्तू खरेदीचे GST सह पावती असणे गरजेचे.

या योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला नसावा. ही माहिती नांदेड जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी दिली आहे.

हे ही वाचा –

पूढील 24 तास राज्यात पडणार मुसळधार पाऊस, या 5 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट…

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तुमच्या राशीनुसार कपडे परीधान करा, तुमच्या जीवनात भरपूर प्रेम आणि आनंद मिळेल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button