ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

बिग ब्रेकिंग! राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, जाणून घ्या कोणते खाते कोणाला?

Allocation of cabinet accounts | राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार देखील उशिराच झाला होता. त्याचवेळी मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर लवकरात लवकर राज्य मंत्रिमंडळाच्या खात्यांचे वाटप (State Cabinet Account Allocation) करण्यात येईल असे म्हटले होते. परंतु या राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप करण्यास देखील उशिराच झाला. यावरून सरकारवर बरीच टीका झाली. त्यानंतर आज 14 ऑगस्ट 2022 रोजी राज्य मंत्रिमंडळाची खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे कोणते खाते वाटप करण्यात आले आहे ते जाणून घेऊया.

एकनाथ शिंदे यांच्याकडील खाती
सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ.

वाचा: बिग ब्रेकिंग: शेअर मार्केटचा किंग राकेश झुनझुनवाला यांचे निधन, संपत्तीचा आकडा ऐकून येईल चक्कर…

देवेंद्र फडणवीस यांच्याकडील खाती
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार.

वाचा: बाप रे! ‘या’ तीन पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, त्वरित जाणून घेऊन या पेयांचे सेवन थांबवा

कोणते खाते कोणाला?

  • राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
  • सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
  • चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
  • डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास
  • गिरीष महाजन- ग्रामविकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
  • गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
  • दादा भुसे- बंदरे व खनिकर्म
  • संजय राठोड- अन्न व औषध प्रशासन
  • सुरेश खाडे- कामगार
  • संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
  • उदय सामंत- उद्योग
  • प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
  • रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
  • अब्दुल सत्तार- कृषी
  • दीपक केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
  • अतुल सावे- सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
  • शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क
  • मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big Breaking! Account allocation of state cabinet announced, know which account to whom

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button