ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Rise in Temperature might threat Production | तापमान वाढीमुळे पिकाच्या उत्पन्नावर होऊ शकतो विपरीत परिणाम‌!

नवी दिल्ली : बदलत्या हवामानात जर सर्वात जास्त नुकसान कोणाचे होत असेल तर तो असतो शेतकरी. आज हवामान खूप विचित्र रित्या बदलत आहे व त्याचा सर्वात जास्त नुकसान उत्पन्नात होत आहे. कमी उत्पन्न भेटल्यामुळे आज शेतकर्याचे हाल खूप वाईट झाले आहेत.साधारणत: मार्चअखेर आणि एप्रिलच्या सुरुवातीला येणाऱ्या उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) परिणाम सध्या दिसून येत आहे. देशातील अनेक भागात उष्णतेची लाट सुरू झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तापमानाचा पारा अचानक 6 ते 8 अंश सेल्सिअसने वाढला असून, त्यामुळे देशभरात उष्णतेची लाट पसरली आहे.उष्णतेच्या लाटेचा परिणाम सामान्य जनजीवनावरच नव्हे तर कृषी क्षेत्रावरही दिसून येत आहे. उच्च तापमानाचा रब्बी पिकांच्या (Rabi Crops) उत्पन्नावर वाईट परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काढणीसाठी तयार असलेल्या पिकांवरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

Increasing Temperature| तापमान वाढ –

बदलता हवामान आणि वाढलेले उष्ण तापमान पिकांवर ती नुकसान करण्याचे काम करीत आहे.यावेळी, देशातील अनेक भागात उष्णतेची लाट सुरू झाल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक दिवसांच्या हवामानाचा अंदाज घेतला तर तापमानात अचानक 6 ते 8 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशा स्थितीत यंदा उष्णतेच्या लाटेने आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे.खाजगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटचा अंदाज आहे की, राजस्थानच्या पश्चिम भागावर प्रतिचक्रवात अस्तित्वात आहे. त्यामुळे देशाच्या उत्तर-पश्चिम आणि मध्य भागात उष्ण आणि कोरडे वारे वाहत आहेत. येत्या 24 तासांत तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याची शक्यता दर्शावली आहे.

Agriculture Expertise | कृषी तज्ञांचे या बाबतीत मत –

कृषी तज्ज्ञांनीही उष्ण अंदाजात असे म्हटले आहे की, उच्च तापमान एक-दोन आठवडे कायम राहिल्यास उत्तर भारतातील पिकांवर (North India) त्याचा वाईट परिणाम होईल. या हवामानाचा पंजाब, हरियाणा, राजस्थानचा काही भाग आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागातील रब्बी पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होईल.याचबरोबर, तीव्र उष्णतेमुळे गडगडाटी वादळे, गारपीट किंवा धुळीचे वादळ यासारख्या तीव्र मान्सूनपूर्व घडामोडी घडू शकतात. या घडामोडींमुळे कापणीसाठी तयार असलेल्या पिकांचेही नुकसान होऊ शकते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button