ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आर्थिक

RBI New Rules | एकापेक्षा जास्त बँक खाती? आरबीआयच्या नवीन नियमामुळे होऊ शकतो मनस्ताप!

RBI New Rules | Multiple bank accounts? RBI's new rules can cause heartache!


RBI New Rules | बँक खाते उघडताना तुम्ही KYC फॉर्म भरता, त्यात तुमचा मोबाईल नंबरही द्यावा लागतो. आता, जर तुमच्या एकापेक्षा जास्त बँक खाती असतील आणि त्या सर्वांना एकच मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला लवकरच त्रास सहन करावा लागू शकतो.

खातेदारांची बँक खाती सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) इतर बँकांशी हातमिळवून KYC नियम कडक करण्याच्या विचारात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बँका ग्राहकांना व्हेरिफिकेशनसाठी अजून कडक नियम करू शकतात. (
RBI New Rules) यात ग्राहकांना दोन मोबाईल क्रमांक द्यावे लागू शकतात आणि तसेच सर्व खात्यांची एकत्रित माहिती जमा करण्याचे धोरण राबविण्यात येऊ शकते.

कोणाला होईल नियमांचा फटका?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरबीआयच्या या नियमाचा परिणाम एका क्रमांकाशी अनेक खाती जोडणाऱ्या ग्राहकांवर, विशेषतः अनेक बँक खातेधारकांवर अधिक होईल. यांना आता यापुढे KYC फॉर्ममध्ये आणखी एक मोबाईल क्रमांक जोडावा लागणार आहे. ग्राहकांना संयुक्त खात्यात पण एक अतिरिक्त, पर्यायी मोबाईल क्रमांक जोडावा लागेल. अर्थ सचिव टी.व्ही. सोमनाथन यांच्या नेतृत्वाखालील एक समिती पूर्ण आर्थिक क्षेत्रात नवीन नियम लागू करण्यासाठी काम करत आहे. फिनटेक कंपन्या नियमांचे उल्लंघन करत असल्याने त्यासाठी कडक पावलं उचलण्यात आली आहेत.

वाचा | Mahila Samman Yojana | महिला सन्मान बचत योजनेत खाते उघडताना घ्यावयाची काळजी वाचा सविस्तर …

नवीन नियमांसाठी काय तयारी?

याप्रकरणी एका अधिकाऱ्याने इकोनॉमिक्स टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त खात्यासाठी पॅन, आधार आणि युनिक मोबाईल क्रमांक सारख्या मल्टि लेव्हल सेकेंडरी आयडेंटिफिकेशन मेथडवर विचार करत आहे. दुसऱ्या सुरक्षाविषयक ओळख पडतळणीसाठी कोणत्याही व्यक्तीच्या अनेक खात्याची माहिती घेण्यासाठी परवानगी घेण्यात येईल. तसेच सर्व खात्याची केवायसी कागदपत्रे पण सारखी ठेवण्यात येतील.

आरबीआयच्या या नवीन नियमांबद्दल तुमचे मत काय आहे?

Web Title | RBI New Rules | Multiple bank accounts? RBI’s new rules can cause heartache!

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button