ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Ration Card | मोठी बातमी! सरकार राज्यातील 1.27 लाख रेशन कार्ड करणारं रद्द; जाणून घ्या तुमचं होणार का?

Ration Card | आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक असलेले कागदपत्र म्हणजे रेशन कार्ड होय. रेशन कार्ड महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी वापरण्यासोबतच त्यावर केंद्र सरकारकडून स्वस्त दरात नागरिकांना अन्नधान्य दिले जाते. तुम्हीही रेशन कार्डधारक (Ration Card) असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. राज्यात डुप्लिकेट रेशन कार्डचे (Ration Card) प्रमाण वाढले आहे. राज्यामधील रेशन डुप्लिकेट रेशन कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाचा: Bhoomi Land Record | जमिनीचे व्यवहार होणार एका झटक्यात! ‘अशा’ जमिनीस सरकार देणार 5 स्टार, जाणून घ्या वहिवाट नकाशा जोडणी प्रक्रिया

रेशन कार्ड रद्द करण्याची कारवाई
महाराष्ट्रात मे महिन्याच्या अखेरपर्यंत 2 लाख 32 हजार 766 रेशन कार्ड डुप्लिकेट आढळली आहेत. ज्यातील तब्बल 1 लाख 27 हजार रेशनिंग कार्ड रद्द केली जाणार आहेत. यामधील सर्वात जास्त रेशन कार्ड हे नागपूर जिल्ह्यातील आहेत. तर परभणी जिल्ह्यात सर्वात कमी आढळले आहेत. तर ‘एक घर, एक रेशनिंग कार्ड’ या योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून अशा शिधापत्रिका रद्द करण्याची कारवाई केली जात आहे.

स्वस्त दरात रेशन कार्डवरून धान्य घेण्यासाठी एका कुटुंबामध्ये चार-चार रेशन कार्ड चालवली जात आहे. यामुळे गरजेपेक्षा जास्त प्रमाणात अन्नधान्य वाढत आहे. जर समजा अंत्योदय योजनेअंतर्गत एका कार्डला 35 किलो तांदूळ मिळत असतील तर घरामागे दिल्या जाणाऱ्या शिध्याचे प्रमाण 70 ते 100 किलो तांदूळ इतके वाढत होते. म्हणूनच आता या कारवाईद्वारे डुप्लिकेट कार्ड रद्द करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गरजवंतांना याचा लाभ होणार आहे.

सर्वाधिक डुप्लिकेट रेशन कार्ड असलेले जिल्हे

  • नागपूर 24,821
  • जळगाव 9,897
  • कोल्हापूर 8,332
  • पालघर 8,032
  • ठाणे 7,268
  • नांदेड 6,535

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big news! Govt cancels 1.27 lakh ration cards in state; Do you want to know?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button