कृषी बातम्या
ट्रेंडिंग

Pune: शेतकऱ्यांच्या मुलाने पुण्यात सुरू केलं हाॅटेल; ‘द बजेट बाइट्स’ चे नगरसेविका सौ. सुजाता सदानंद शेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन

The Budget Bites: शेतकऱ्याचा मुलगा प्रकाश वाघ आणि त्याचा मित्र प्रज्वल इंगळेने मिळून सुरू केल ‘द बजेट बाइट्स’ रेस्टॉरंट.(The Budget Bites Restaurant) विद्यार्थी आणि बाहेर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पोटपूजेसाठी ‘द बजेट बाइट्स’ सज्ज झाले आहे. ‘द बजेट बाईट्स’ या नूतन रेस्टॉरंटचे उद्घाटन मा. सौ. सुजाता सदानंद शेट्टी व नगरसेविका पुणे म.न.पा. व मा. सदानंद कृष्णा शेट्टी मा. स्थायी समिती अध्यक्ष पुणे म.न. पा. यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

‘द बजेट बाईट्स’ शेट्टी कॉर्नर, कमला नेहरू हॉस्पिटल जवळ, सिंचन भवन जवळ, मंगळवार पेठ (पुणे, महाराष्ट्र 411011 ) येथे आहे. शेतकऱ्याचा मुलगा आणि त्याचा मित्र यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रात ५०० हून अधिक शाखा खोलण्याचे ध्येय ठेवून “द बजेट बाइट्स” ही स्टार्टअप सुरू केली आहे.

या स्टार्टअपचा मुख्य उद्देश विद्यार्थी आणि बाहेर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वस्त आणि आरोग्यदायी जेवण उपलब्ध करून देणे हा आहे. ‘द बजेट बाइट्स’च्या सर्व जेवणांमध्ये उत्तम दर्जा राखण्यावर भर दिला जातो. जेवण बनवण्यासाठी लागणारे धान्य आणि इतर सर्व पदार्थ हे थेट शेतकऱ्यांकडून खरेदी केले जातात.

त्यामुळे जेवणाची गुणवत्ता उत्तम राहतेच, शिवाय शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळतो. यामुळे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या बजेटमध्ये बसणारी आणि आरोग्यदायी जेवणांचा आनंद घेता येतो. बजेट बाइट्सचा स्वप्न आहे की, महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी आणि बाहेर राहणारा कर्मचारी स्वादिष्ट आणि आरोग्यदायी जेवणांचा आनंद घेऊ शकेल. त्यांच्या या ध्येयामुळे लवकरच राज्यात सर्वत्र बजेट बाइट्सच्या शाखा पाहायला मिळतील. तर आपल्या या शेतकऱ्यांच्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘द बजेट बाईट्स’ला नक्की भेट द्या

हॉटेल चा पत्ता: https://g.co/kgs/QvZrJ1e

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button