नगर : जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी डाळिंबावर (pomegranate) बुरशीजन्य (Fungal) रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे याशिवाय तेलकट डाग (Oily stains) देखील डाळींबावर पडले असून शेतकरी हैराण (Farmers harassed) झाले आहेत.
नगर जिल्ह्यातील पाथर्डी,शेवगाव, नगर, श्रीगोंदा, संगमनेर ,राहुरी, पारनेर आधी बागांमध्ये मोठ्या प्रमाणात हवामानाचा मोठा फटका डाळींब बागांवर पडलेला दिसून येतो, मागील काही काळामध्ये दुष्काळ, अन्य नैसर्गिक संकटांमुळे (Due to natural disasters) शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक (Financial) हाल झाले आहेत यंदा मात्र डाळिंबाला चांगला दर असला तरीही डाळिंबवर पडणाऱ्या रोगांमुळे शेतकरी हतबल झाले आहेत.
उपायोजना : (Measures)
जिल्ह्यामध्ये डाळिंबावर बुरशीजन्य स्कॅब, अल्टानेटा,पुनिकी,स्पेसीज,कोलेटोट्रीकम अशा रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे चला तरी आपण यावर उपाय योजना काय आहेत हे पाहूया…
अशा रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अझोक्सीस्रोबीन 23% एस सी 10मिली किंवा जायफेनकोनॅझोन, 25% इ सी 5 ते 10 मिली किंवा प्रॉपिनेब 70% wp 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी तज्ञांशी (With experts) संपर्क साधावा.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :