ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

PM Kisan Yojana | काय सांगता? पीएम किसान योजनेमुळे केवळ 6 हजार मिळत नाहीतर, होतात ‘हे’ दोन मोठे फायदे

PM Kisaan Yojana | देशभरातील शेतकरी आज पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेद्वारे पंतप्रधान किसान निधी योजनेच्या (PM Kisan Nidhi Yojana) माध्यमातून वर्षाकाठी 6 हजार रुपये 3 हप्त्यांमध्ये मिळतात. शेतकऱ्यांची आर्थिक (financial) परिस्थिती व होणाऱ्या शेतीतील नुकसानीस (agricultural loss) हातभार म्हणून शेतकऱ्यांनी केंद्र सरकारकडून ही आर्थिक मदत (Central Government Farmers Financial Assistance) केली जात आहे. मात्र, तुम्हाला माहित आहे का? की केवळ पीएम किसान योजनेचा (PM Kisan Nidhi Yojana installment) केवळ 6 हजारांसाठी फायदा होत नाही. तर आणखी दोन योजनांचा या माध्यमातून फायदा होतो. चला तर मग या दोन कोणत्या योजना आहेत आणि याचा शेतकऱ्यांना काय फायदा होतो हे जाणून घेऊयात.

पीएम किसान योजना
पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 4 महिन्यातून 2 हजारांचा हप्ता मिळतो. या योजनेत सरकार शेतजमीन, आधार, मोबाईल क्रमांक आणि बँक खाते क्रमांक आदींची पडताळणी करते, त्यानंतर लाभ मिळतो. या आधारावर इतर कृषी योजनांसाठीही तुमची ओळख शेतकरी म्हणून आहे. पीएम किसान योजनेचा 12वा हप्ता ऑगस्टमध्ये येण्याची शक्यता आहे. 11 कोटी शेतकर्‍यांसाठी सरकार एकाच वेळी 22,000 कोटी रुपये जारी करेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ई-केवायसी आणि इतर प्रक्रिया करणे आवश्यक आहे.

पीएम किसान योजनेमुळे काय होतात दोन फायदे?

किसान क्रेडिट कार्ड मिळवणं होईल सोपं
पीएम किसान सन्मान निधी योजना किसान क्रेडिट कार्ड योजनेशी (Kisan Credit Card Scheme) म्हणजेच केसीसीशी जोडली गेली आहे. केसीसी बनवण्याच्या कामाला गती मिळावी म्हणून हे करण्यात आले आहे. मोदी सरकारने विशेष मोहीम राबवून 2.51 कोटी केसीसी जारी केले आहेत. ज्यांची क्रेडिट मर्यादा 2.64 लाख कोटी रुपये आहे. सध्या पीएम किसान योजनेचे सदस्य असलेल्या शेतकऱ्यांना केसीसी करणे सोपे होणार आहे. कारण त्याचे जमिनीचे रेकॉर्ड, आधार आणि बँक खाते यापूर्वीच पडताळलेले आहे. इतकचं नाही, तर पीएम योजनेच्या वेबसाइटवर केसीसीचा फॉर्मही अपलोड करण्यात आला आहे. किसान क्रेडिट कार्डवर 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज केवळ 4 टक्के व्याजावर उपलब्ध आहे.

पीएम किसान मानधन योजना
जर तुम्ही शेती करत असाल आणि पीएम किसान योजनेंतर्गत तुम्हाला वार्षिक 6000 रुपये मिळत असतील, तर या पैशातून शेतकरी पेन्शन योजनेचा प्रीमियम थेट कापला जाऊ शकतो. तुम्हाला स्वतःच्या खिशातून पैसे गुंतवण्याची गरज नाही. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना पीएम किसान मानधन योजनेसाठी (PM Kisan Mandhan Yojana) आधार कार्डाशिवाय इतर कोणतेही कागदपत्र द्यावे लागणार नाही. कारण अशा शेतकऱ्याची संपूर्ण नोंद भारत सरकारकडे आहे. तुम्ही पीएम किसान योजनेअंतर्गत मिळालेल्या रकमेतूनच मानधन योजनेचा प्रीमियम भरणे निवडू शकता. सध्या देशात सुमारे 23 लाख शेतकरी किसान पेन्शन योजनेत नोंदणीकृत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button