ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
PM KISANकृषी बातम्या

PM Kisan | कृषी मंत्रालयाच्या मोठा निर्णय! पीएम किसानच्या 4 नियमांमध्ये केला बदल, आता ‘या’च शेतकऱ्यांना मिळणार पैसे

PM Kisan | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (pm kisan samman nidhi) च्या 13 व्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या करोडो लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. जर तुम्हीही या सरकारी योजनेसाठी (Financial) अर्ज केला असेल, तर या महिन्यातच तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. पण त्याआधी कृषी मंत्रालयाने (Department of Agriculture) नियमांमध्ये मोठा बदल केला आहे, ज्यामुळे खात्यात पैसे येणार नाहीत.

वाचा:शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नव्या वर्षात वाढणार पीएम किसानचा हप्ता, शेतकऱ्यांना मिळणारं ‘इतके’ पैसे

सरकारने जारी केलेल्या सूचना
पीएम किसानच्या 13व्या हप्त्यासाठी काही लाभार्थ्यांनाच पैसे (Bank Loan) मिळतील. सरकारने म्हटले आहे की, जो कोणी शेतकरी (Agriculture) या 4 पॅरामीटर्सची पूर्तता करेल, त्याच्या खात्यात पैसे येतील.

सोयाबीन उत्पादकांसाठी खुशखबर! प्रति क्विंटल 6 हजार मिळणारं भाव, जाणून घ्या कधी करावी विक्री?

  1. शेतकऱ्याच्या जमिनीच्या नोंदीमध्ये असे लिहिले पाहिजे की, शेतकरी त्या जमिनीचा वास्तविक मालक आहे.
  2. याशिवाय, पीएम किसान पोर्टलवर शेतकऱ्याने त्याची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असावी.
  3. याशिवाय शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी लिंक करावे.
  4. बँक खाते नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) शी देखील जोडलेले असावे.

जर कोणत्याही शेतकऱ्याने या चार बाबींची पूर्तता केली तरच त्याला या सुविधेचा लाभ घेता येईल. याशिवाय ज्या शेतकऱ्यांचे तपशील पूर्ण नाहीत त्यांच्या खात्यात पैसे येणार नाहीत.

12 हप्त्यांमध्ये कोट्यवधी शेतकऱ्यांची कपात करण्यात आली
पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता म्हणून सरकारने सुमारे 22,552 कोटी रुपये जारी केले. त्याच वेळी, सरकारने 12 वा हप्ता म्हणून 17,443 कोटी रुपये जारी केले होते. यामध्ये लाभार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली होती. 30 जानेवारीपर्यंत, केंद्र आणि राज्य सरकार सर्व पात्र शेतकऱ्यांना 13 व्या हप्त्याचा लाभ मिळेल याची खात्री करत आहेत.

वाचा:आता पिकांसाठी खतचं ठरतंय वरदान! शेतकऱ्यांनो एका क्लिकवर त्वरित जाणून घ्या खतांचे नवीतम दर

पीएम किसानबद्दल येथे तक्रार करा
तुम्हाला या योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास, तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय तुम्ही [email protected] या ईमेल आयडीवर मेल करून तुमची समस्या सांगू शकता.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big decision of the Ministry of Agriculture! Changed in PM Kisan’s 4 rules, now only farmers will get money

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button