योजना

Subsidy Scheme| ‘या’ सवलत योजनेअंतर्गत चक्क शून्य टक्के व्याजदरात मिळणार कर्ज, या जिल्ह्याला मिळाले तब्बल 57 कोटी

Subsidy Scheme| कित्येक लोक धंद्यासाठी, व्यवसायासाठी विविध बँकांचं कर्ज काढत असतात. शेतकरी देखील शेतीसाठी पीककर्ज (Crop Loan) काढत असतात. कित्येक धनदांडगे उद्योगपती कर्जफेड न करता परदेशात पळून जातात, अशी कित्येक उदाहरणे भारतात आहेत. मात्र शेतातील उत्पन्नाच्या जोरावर शेतकरी त्या पीक कर्जाची नियमित परतफेड करीत असतात. या शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता व्याजात सवलत मिळणार आहे. यासाठी शासनाने एक योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना. (Subsidy Scheme)

वाचामक्याचे दाणे सुकतात पण झाडं हिरवीचं राहतात; जनावरांच्या चाऱ्यासह भरघोस उत्पादनासाठी करा ‘या’ दोन जातींची निवड

काय आहे ही योजना

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना असं या योजनेचं नाव आहे. या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची नियमित आणि वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेत अल्पमुदत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपये कर्ज घेतल्यास व्याजात 3 टक्के सवलत मिळत होती. तसेच 1 ते 3 लाख रुपये कर्ज घेतले असल्यास व्याजदरात 1 टक्के इतकी सवलत मिळत होती. मात्र या सवलतीत आता बदल करण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना व्याजदरात आता अधिक सवलत मिळणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी व ग्रामीण बँकातून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

योजनेत झाले असे बदल

नुकतंच महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget) पार पडलं. या अधिवेशनात शासनाने अनेक आकर्षक निर्णय घेतले, अनेक घोषणा केल्या. त्यापैकीच एक या योजनेसंदर्भात आहे. आता डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत 3 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज हे शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होणार आहे. त्यानुसार राज्य सरकारकडून या व्याजदरात 3 टक्के व केंद्र सरकारकडून 3 टक्के म्हणजे एकूण 6 टक्के अशी सवलत मिळणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना सदरचे पीक कर्ज हे शून्य टक्के व्याजाने उपलब्ध होणार आहे.

वाचाबाप रे! ब्रिटनमध्ये चक्क रोपट घेतंय जीव; जाणून घ्या नेमकं ‘हे’ रोपट आहे तरी कसं?

या जिल्ह्याला मिळाले तब्बल 57 कोटी

या योजनेचा शेतकऱ्यांना खूप लाभ होत आहे. पुणे जिल्ह्यातील 2 लाख 88 हजार 917 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यावर या सवलतीचे एकूण 57 कोटी 31 लाख 77 हजार 25 रुपये जमा करण्यात आले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या प्राप्त निधीतून तसेच शासनाकडून प्राप्त निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी दिली.

या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होत आहे. तसेच नियमित कर्ज परतफेड झाल्याने बँकांची वसुली वाढली आहे. यामुळे बँकांनाही फायदा होत आहे.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button