ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञान

Increase Sugarcane Production | एकरी १०५ टन ऊस! शेतकऱ्यांच्या चिकाटी आणि क्रांतिअग्रणीच्या मार्गदर्शनाने घडलं अशक्य वाटणारं!

Increase Sugarcane Production 105 tons of sugarcane per acre! With the perseverance of farmers and the guidance of revolutionaries, the impossible has happened!

Increase Sugarcane Production | सांगली येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या ऊसविकास विभागाने शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढीसाठी पाठिंबा देण्यासाठी पथदर्शक प्रकल्प राबविला. या प्रकल्पातून सुमारे २० हून अधिक शेतकऱ्यांनी (Increase Sugarcane Production) एकरी शंभर टनांपेक्षा अधिक उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य केले आहे.

कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी सांगितले की, कारखान्याकडून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान आणि सल्ला देण्यात येतो. यामुळे शेतकरी योग्य नियोजन करून ऊस उत्पादन वाढवू शकतात. कारखान्याने राबविलेल्या पथदर्शक प्रकल्पातही शेतकऱ्यांना उत्तम यश मिळाले आहे.

कारखान्याच्या ऊसविकास विभागाकडून शेतकऱ्यांना नांगरट, रोटर अशी पूर्वमशागत, माती परीक्षण, हिरवळीच्या खतांचा वापर यासारख्या बाबींमध्ये मार्गदर्शन केले जाते. यामुळे जमिनीची सुपिकता वाढून ऊसाची वाढ चांगली होते.

वाचा : Farmers Movement | शेतकऱ्यांचं पुन्हा दिल्ली धावायचं; 26 फेब्रुवारीला महामोर्चा! 7 धमाकेदार मागण्यांसह धर्मयुद्धाला सज्ज!

या पथदर्शक प्रकल्पात सहभागी झालेले उदय लाड यांनी सांगितले की, ते नेहमी उसाचे सरासरी एकरी ७५ ते ८० टन उत्पादन घेत होते. पण कारखान्याच्या ऊसविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एकरी शाश्वत १०० टन या उपक्रमात भाग घेतला. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी एकरी १०५ टन ऊस उत्पादन घेतले.

कारखान्याच्या अध्यक्ष शरद लाड यांनी सांगितले की, कारखाना कार्य क्षेत्रात उसाच्या उत्पादन वाढीसाठी पथदर्शक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. एकत्रित प्रयत्नातून सरासरी उत्पादन ६० टनांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे.

Web Title : Increase Sugarcane Production 105 tons of sugarcane per acre! With the perseverance of farmers and the guidance of revolutionaries, the impossible has happened!

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button