Onion prices have doubled in the last five days | कांद्याच्या वाढत्या भावांमुळे नागरिकांमध्ये नाराजी, दर ठरवण्याचा अधिकार आता थेट वाणिज्य मंत्रालयाकडे
Due to rising prices of onion, the citizens are upset, the right to decide the price now goes directly to the Ministry of Commerce
नवी दिल्ली/नाशिक: कांद्याच्या वाढत्या भावांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या पाच दिवसांत कांद्याच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. 40 किलोची गोणी 450 रुपयांवरून 800 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. बाजारात कांद्याची तीव्र तुटवडा जाणवत आहे. या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कांद्याचे दर आता थेट वाणिज्य मंत्रालय ठरवणार:
या समस्येवर उपाय म्हणून, केंद्र सरकारने कांद्याबाबत नाफेड आणि एनसीसीएफचे अधिकार गोठवले आहेत. आता कांद्याचे दर थेट वाणिज्य मंत्रालय ठरवणार आहे. यापूर्वी, एनसीसीएफ आणि नाफेड हे दर निश्चित करत होते. मात्र, बाजार समितीपेक्षा कमी दर या संस्थांकडून दिले जात असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. याच कांदा प्रश्नामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीलाही फटका बसला होता.
वाचा:Heavy rain | महाराष्ट्रात पावसाला सुरुवात: काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज!
व्यापारी आणि नाफेडमध्ये स्पर्धा गरजेची:
काही तज्ञांचा असा विश्वास आहे की, कांद्याच्या दरांमध्ये वाढ होण्यामागे व्यापारी आणि नाफेड यांच्यातील स्पर्धेचा अभाव हा एक प्रमुख कारण आहे. जर दोन्ही गट कांदा खरेदी करतील तरच त्याला योग्य भाव मिळेल असे मत आहे. याबाबत, भाजप नेते जयदत्त होळकर यांनी वाणिज्य मंत्रालयाकडे कांदा दर ठरवण्याच्या मुद्यावर मागणी केली आहे.
नागरिकांनी कांदा साठवण्यास सुरुवात केली:
दुसरीकडे, पावसाला सुरुवात झाली असल्याने नागरिकांनी साठवणीसाठी कांदा खरेदीला जोरदार सुरुवात केली आहे. त्यामुळे शहापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात भरत असलेल्या आठवडे बाजारामध्ये कांदे खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
किरकोळ बाजारात कांद्याचे भाव:
किरकोळ बाजारात कांदा 30 ते 50 रुपये प्रति किलो मध्ये विकला जात आहे. तर घाऊक भावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून कांद्याचे भाव हे प्रति क्विंटल 2600 ते 3000 रुपया पर्यंत उच्चांक गाठला आहे.
शेतकऱ्यांना दिलासा, ग्राहकांना मात्र त्रास:
कांद्याच्या वाढत्या भावामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, ग्राहकांना मात्र याचा त्रास सहन करावा लागत आहे. सरकारने लवकरच या समस्येवर उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्याची अपेक्षा आहे.




