Soybean Prices Down | सोयाबीनचे दर नरमले! पण कापसाच्या दराचं काय? जाणून घ्या शेतमालाचे ताजे बाजारभाव
Soybean Prices Down | महाराष्ट्रातील कृषी बाजारात विविध पिकांच्या भावात उतार-चढाव सुरू आहेत. सोयाबीनच्या भावावर (Soybean Prices Down) दबाव निर्माण झाला आहे, तर कापूस (Cotton Rate) आणि डाळिंबाचे भाव टिकून आहेत. कांद्याच्या भावात मात्र मागील काही दिवसांपासून सुधारणा झाली आहे.
सोयाबीन
सोयाबीन प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांनी भावात घट केल्याने सोयाबीनच्या भावावर दबाव निर्माण झाला आहे. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची खरेदी कमी दरात सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरूच आहेत.
कापूस
यंदा देशातील उत्पादनात घट येण्याची शक्यता असूनही, बाजारात कापसाची आवक चांगली आहे. बाजारातील कापसाची गुणवत्ता चांगली असल्याने भाव स्थिर आहेत. देशातील बाजारात कापसाचा आज सरासरी भाव ६ हजार ९०० ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान आहे.
कांदा
देशातील बाजारात कांद्याची आवक खूपच कमी आहे. कांद्याला उठाव चांगला असल्याने भाव टिकून आहेत. खरिप लाल कांद्याची आवक सुरू झाली असली तरी, मागणीच्या तुलनेत आवक कमी आहे. लाल कांद्याला सरासरी ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. उन्हाळ कांद्याचा भाव ५ हजारांच्या पुढे आहे.
डाळिंब
बाजारातील आवक कमी असल्याने डाळिंबाचे भाव सध्या टिकून आहेत. पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा डाळिंब पिकाला मोठा फटका बसत आहे. बाजारात सध्या डाळिंबाची आवक पूर्ण क्षमतेने सुरु नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. बाजारात डळिंबाला सरासरी ९ हजार ते १० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे.
आले
यंदा आले पिकाचे क्षेत्र वाढले असल्याने उत्पादन वाढले आहे. मध्यंतरी आले पिकाला पावसाचा फटका बसला, तरीही लागवड जास्त असल्याने आल्याचे भाव कमी झाले आहेत. सध्या आल्याला बाजारात प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ते ६ हजारांचा भाव मिळत आहे.
हेही वाचा:
• मेष, मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात होणारं लाभ, वाचा आजचे राशीभविष्य
• महिलांसाठी आनंदाची बातमी! महिन्याला खात्यावर जमा होणार 7 हजार रुपये, पाहा मोदी सरकारची नवी योजना