Agricultural Market | शेतकऱ्यांनो टोमॅटोच्या भावात घसरण! जाणून घ्या कापूस, सोयाबीन, तूर आणि मक्याचे आजचे दर
Agricultural Market | शेती बाजारात सध्या उतार-चढाव सुरू आहे. विशेषतः सोयाबीन, कापूस, तूर आणि मका या पिकांच्या दरात मोठे बदल दिसून येत आहेत. (Agricultural Market)
सोयाबीन: आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात उतार-चढाव सुरू असला तरी, देशांतर्गत बाजारात मंदीचे वातावरण आहे. प्रक्रिया प्लांट्समध्ये सोयाबीनचे दर ४४०० ते ४४५० रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहेत, तर बाजार समित्यांमध्ये हा दर ३९०० ते ४१०० रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. तज्ज्ञांचा अंदाज आहे की, सोयाबीनच्या दरावरील हा दबाव अजून काही आठवडे कायम राहू शकतो.
कापूस: आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात स्थिरता असली तरी, देशांतर्गत बाजारात मागणी कमी असल्याने दर स्थिर आहेत. सध्या कापसाचा दर ६८०० ते ७२०० रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. तज्ज्ञांच्या मते, पुढील काही आठवड्यांमध्ये कापसाची आवक वाढण्याची शक्यता आहे.
तूर: देशात तुरीचे उत्पादन वाढण्याची शक्यता असल्याने, बाजारात तुरीचे दर कमी झाले आहेत. सध्या तुरीचा दर ७००० ते ७५०० रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. नव्या तुरीमध्ये ओलाव्याचे प्रमाण जास्त असल्याने आणि नव्या मालाची आवक कमी असल्याने, पुढील काही आठवड्यांमध्ये तुरीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
वाचा: जामखेडच्या तरुणीची छत्रपती संभाजीनगरमध्ये हत्या; मृतदेह ओढ्यात फेकला अन्… असा सापडला आरोपी
मका: इथेनॉलसाठी मक्याची मागणी वाढल्याने मका बाजाराला आधार मिळाला आहे. सध्या मकाचा दर २१०० ते २२५० रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. रब्बी हंगामात मक्याची लागवड अपेक्षेपेक्षा कमी झाल्याने, भविष्यात मकाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
टोमॅटो: बाजारात टोमॅटोची आवक वाढल्याने टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या टोमॅटोचा दर ७०० ते १४०० रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. तज्ज्ञांच्या मते, पुढील काही आठवड्यांमध्ये टोमॅटोची आवक कायम राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
• मिथुन आणि सिंह राशीसह ‘या’ चार राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात चांगल्या संधी, आर्थिक लाभाचा योग
• प्रा. राम शिंदे यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार, ॲड. अभय आगरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती