ताज्या बातम्या

Maratha Reservation | ब्रेकींग! मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Breaking! Maratha community will not give Kunbi certificates; Chief Minister Eknath Shinde

Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत ओबीसी समाजात निर्माण झालेली चिंता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूर केली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. तसेच, ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लावणार नाही, अशीही हमी दिली आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत बैठक
राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होईल, या भीतीवरून काही दिवसांपासून आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला पाहता, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. या बैठकीत शिंदे-फडणवीसांनी ओबीसी नेत्यांना दिलासा दिला आहे.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार नाही
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही, त्यांचं आरक्षण कमी होणार नाही, अशी भूमिका आधीपासून सरकारची आहे.

वाचा : Maratha Reservation | मराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल! म्हणताहेत “बोलून मोकळं व्हायचं…”

ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही
शिंदे म्हणाले की, ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लावणार नाही. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल.

ओबीसी समाजाच्या इतर मागण्याही ऐकल्या
या बैठकीत ओबीसी समाजाच्या इतर मागण्याही ऐकल्या. यात सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि टीआरपीचा समावेश आहे. यामध्ये काही प्रमाणात विसंगती त्यांनी लक्षात आणून दिली.

चंद्रपूर बंद मागे घेतला
या बैठकीनंतर चंद्रपूर मधील ओबीसी तरुणांचं उपोषण सोडवण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार आहेत. तसेच, उद्याचा चंद्रपूर बंद ओबीसी महासंघाने मागे घेतला आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Breaking! Maratha community will not give Kunbi certificates; Chief Minister Eknath Shinde

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button