पीक कर्ज | खुशखबर! दोनच दिवसात रकमेच्या खात्यावर 34 कोटी रुपये, व्याज सवलत लाभाचा लाभ; ‘या’ सदस्याला परतावा
Interest Subsidy| शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार विविध योजना लागू करतं असतं. त्यापैकीच एक म्हणजे डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत बिनव्याजी पीक कर्ज (Crop loan) उपलब्ध करून दिलं जातं. त्यानुसार या योजनेतील लाभार्थ्यांचं काही अनुदान प्रलंबित होतं. मात्र येत्या दोन दिवसात या लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानापोटी 33 कोटी 98 लाख रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन हंगामाच्या सुरुवातीआधी खुश करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
वाचा: विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर
इतक्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ
2018-19 ते 2020-21 या तीन वर्षांचा व्याज परतावा प्रलंबित होता. मात्र शासनानं हे व्याजदर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार या योजनेतील प्रलंबित 2 लाख 67 हजार 256 शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा होणार आहे. हे अनुदान आहे तब्बल 33 कोटी 98 लाख रुपये इतकं. येत्या दोन दिवसात हे अनुदान जमा होणार आहे.
पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना या योजनेअंतर्गत सुरुवातीला एक लाख रुपयांपर्यंतचं पीक कर्ज हे शून्य टक्के व्याजदराने मिळत होतं. त्यानंतर ही मर्यादा तीन लाखांपर्यंत करण्यात आली. याबाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. सन 2022-2023 पासून पाच लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजदरानं उपलब्ध होणार आहे. याची अंमलबजावणी 2022-23 पासून केल्याने त्याचा लाभ पुढील वर्षीपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे.
या जिल्ह्यासाठी मिळाले 56 कोटी
कोल्हापूर जिल्ह्याला 2018-19 ते 2020-2021 या तीन वर्षाचा व्याज परतावा मिळाला आहे. त्यासाठी गेल्या आर्थिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्याला 56 कोटी 28 लाख रुपये मिळाले आहेत. कोल्हापुरात उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे मार्च व जूनमध्ये पीक कर्जाची उचल जास्त होते. जिल्ह्यात पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी 85 टक्के शेतकऱ्यांकडून वर्षाच्या आत परतफेड केली जाते. जिल्हा बँकेने सुमारे 2 हजार 145 कोटी रुपये इतक्या पीक कर्जाचं वाटप केलं आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूरला व्याज परताव्याचा अधिक लाभ मिळतो.
काय आहे योजना
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेनुसार तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजदरात पीक कर्ज दिलं जातं. जिल्हा मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका आणि ग्रामीण बँकांच्या माध्यमातून हे कर्ज वाटप केलं जातं. पीक कर्जाची उचल घेतल्यापासून 365 दिवसांच्या आत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या व्याज सवलत योजनेचा लाभ घेता येतो.
हेही वाचा:
- सरकारी कचेऱ्यांना वैतागलाय! काळजी करू नका, आता मोबाईलवरच मिळणार शेतीचे नकाशे
- चढ की उतार काय आहेत आज तूर ,सोयाबीन, अन् कांद्याचे ताजे बाजारभाव? त्वरित जाणून घ्या
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..