ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Loan Repayment |१५ हजार ३५२ कोटी ५० लाख रुपये वाचवायचे आहेत, तर ३१ मार्चपर्यंत थकबाकी या पद्धतीने भरा..

If you want to save Rs 15,352 crore 50 lakhs, pay the arrears by March 31

Loan Repayment |कृषिपंप वीजजोडणी धोरणानुसार, कृषीपंपाच्या थकीत असलेल्या वीजबिलामधून थकबाकी मुक्त होण्यासाठी आता केवळ एक महिन्याची मुदत राहिली आहे. त्यामुळे या मुदतीच्या थकबाकीची ५०% रक्कम व पूर्ण चालू वीजबिल येत्या ३१ मार्चपर्यंत भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकीची रक्कम देखील माफ करण्यात येत आहे.

वाचा: 31 जिल्ह्यात 14 हजार 141 कांदा चाळी उभारल्या जाणार; 125 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता, शेतकऱ्यांना होणार असा फायदा..

व्याज माफ केले जाणार:

कृषीपंपाच्या विजबिलामधून थकबाकी मुक्त होण्यासाठी राज्यातील ४४ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या मूळ थाकबाकीमधील व्याज आणि विलंब माफ केला जाणार आहे. महावितरणकडून सुटीचे एकूण १५ हजार ९७ कोटी रुपये माफ केले आहेत. तर आत्तापर्यंत वीजबिलाच्या दुरुस्तीमधून ३०० कोटी २४ लाख रुपयांचे समायोजन केले आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडे ३० हजार ७०५ कोटी रुपयांचे थकबाकी आहे. त्यापैकी ५०% थकबाकी ३१ मार्चपर्यंत भरल्यास ५०% म्हणजे १५ हजार ३५२ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी माफ होणार आहे, असे महावितरणने कळवले आहे.

आतापर्यंत २१ लाख ७९ हजार ८१६ शेतकऱ्यांनी चालू वीजबिल आणि थकबाकीची काही रक्कम भरून योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांना व्याज आणि दंड मिळून ६ हजार ७६९ कोटी ५० लाख रुपयांची सवलत मिळाली आहे. या शेतकऱ्यांनी ५०% थाकबकीच्या रकमेमधील चालू वीजबिल भरून राज्यातील ३ लाख ९७ हजार १९९ शेतकऱ्यांनी वीजबिल संपूर्णपणे कोरे केले आहे. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे. थकबाकीमुक्त योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button