ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Kharif season | शेतकऱ्यांनो खते-बियाणे खरेदीबाबत अडचण आल्यास थेट ‘अशी’ करा व्हॉट्सऍपवर तक्रार

आता खरीप हंगाम तोंडावर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये लगबग सुरू झाली आहे. आता शेतकऱ्यांना शेतीची (Agriculture) व्यवस्थित मशागत (Cultivated) करावी लागणार आहे.

Kharif Season | शेतकरी खते (Fertilizer), बियाणे (Seeds) , कीटकनाशके (Pesticides), औषधे खरेदी करण्याच्या मार्गावर आले आहेत. 1 जूनपासून बियाणे विक्री (Sell seeds) करण्यास सुरुवात होणार आहे. त्याचवेळी आता खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते, बियाणे, कीटकनाशके यासर्व बाबी खरेदी करताना कोणतीही अडचण आढळल्यास शेतकरी थेट व्हॉट्सऍपच्या (WhatsApp) माध्यमातून तक्रार (Complaint) दाखल करू शकणार आहेत. याबाबत कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी माहिती दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया शेतकरी कशा पद्धतीने तक्रार दाखल करू शकणार आहे.

‘अशा’पद्धतीने करा तक्रार
“निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी, लिंकिंगबाबत शेतकऱ्यांना अडचणी आल्यास या समस्यांचे निराकारण कृषी आयुक्तालयाकडून केले जाणार आहे. शेतकऱ्यांकडून थेट व्हॉट्सऍपवर आलेली तक्रार कृषी आयुक्तालयात स्वीकारली जाणार आहे. शेतकऱ्यांना तक्रार नोंदवताना काही आवश्यक बाबींचा उल्लेख या तक्रारीमध्ये करणे अनिवार्य असेल. शेतकऱ्यांना तक्रार नोंदवताना सर्वप्रथम आपले नाव, पत्ता, मोबाईल नंबर, तक्रारीसंदर्भात थोडीफार माहिती द्यावी लागणार आहे. ही माहिती शेतकरी आपल्या हस्ताक्षरात लिहून व्हॉट्सऍपच्या माध्यमातून फोटोद्वारे पाठवू शकतात,” अशी माहिती निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक दिलीप झेंडे यांनी दिली आहे.

वाचा: Onion Rate | कांदा विक्रीतच होणार शेतकऱ्यांची बचत, आता बाजारात पोहोचणार ‘असा’ कांदा

कृषी आयुक्तालयाने उघडला नियंत्रण कक्ष
कामातील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी कृषी आयुक्तालयाने एक नियंत्रण कक्ष उघडला आहे. त्याचवेळी शेतकरी आपले दहा ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत समस्या किंवा तक्रार दाखल करू शकतात. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी 9 अधिकारी निरीक्षक म्हणून कार्यरत असणार आहेत. त्याचवेळी बियाणे कायदा 1966, बियाणे नियंत्रण आदेश 1983, महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा 2009, खत वाहतूक नियंत्रण आदेश 1973, खत नियंत्रण आदेश 1985, कीटकनाशके कायदा 1968, कीटकनाशके नियम 1971 आणि कीडनाशके नियंत्रण आदेश 1986 या सात कायद्यामधील तरतुदीनुसार 9 अधिकारी योग्य ती कारवाई करू शकणार आहेत. राज्यामधील शेतकरी संस्था निविष्ठांशी संबंधित विविध उत्पादक, वाहतूकदार, वितरक, विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचे निराकारण या कक्षात केली जाईल.

वाचा: Subsidy | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांची यादी जाहीर

शेतकरी ‘या’वर करू शकतात तक्रार
राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष: मोबाईल नं. 8446117500, 8446221750, 8446331750
टोल-फ्री नं: 18002334000
ई-मेल: [email protected]
वर दिलेल्या क्रमांकावरून शेतकरी आपली तक्रार व्हॉट्सऍपवर नोंदवू शकतात. त्याचबरोबर इमेल आयडीवर देखील आपली तक्रार दाखल करू शकतात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button