ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Today’s Weather Update | शेतकऱ्यांनो राज्यात पुढचे पाच दिवस बरसणार मुसळधार पाऊस, ‘या’ ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी, जाणून घ्या कुठे?

Today’s Weather Update | पावसाची शेतकरी आणि नागरिक मोठ्या उत्साहाने वाट पाहत होते. खेर मान्सून आता राज्यामध्ये दाखल झाला आहे. इतकच नाही तर हवामान विभागाकडून (Today’s Weather Update) राज्यांमध्ये पुढचे पाच दिवस मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेली कित्येक दिवस पेरणीसाठी खोळंबून बसलेला शेतकरी आता पेरणीच्या सुरुवातीला लागणार आहे. तर नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात हवामान विभागाने कोठे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

शेतकऱ्यांच्या पेरणीला येणार वेग

आता राज्यात पाऊस होणार असल्याने शेतकऱ्यांच्या पेरणीला वेग येईल. योग्य प्रमाणात पाऊस पडल्यास शेतकरी राजा आनंदाने बहरेल. तसेच हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवल्याने किती पाऊस होईल याचीही चिंता आहेच. कालपासून मुंबईमध्ये पावसाची रिमझिम होत असल्याने मुंबईकर सुखावले आहेत. दादर, कुर्ला, बांद्रा, बोरिवली, कुलाबा परिसरात सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

https://twitter.com/Hosalikar_KS/status/1672528759654871040?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1672528759654871040%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

कोठे पडणार पाऊस?

राज्यात पुढचे 5 दिवस मान्सून बहुतांश भागात सक्रिय असण्याची शक्यता आहे. कोकणात व विदर्भात काही दिवस मुसऴधार ते अती मुसऴधार पावसाची शक्यता आहे. पुणे सातारा नाशिकमध्ये देखील मुसऴधार ते अती मुसऴधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर मराठवाड्यात देखील पावसाचा जोर राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर या शहरांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Web Title: Farmers, heavy rain will rain in the state for the next five days, orange alert issued at this place, know where?

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button