ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Hailstorm Compensation | 10 दिवसात होणार मदतीची घोषणा, नुकसान भरपाईत ‘इतकी’ होणार वाढ; अब्दुल सत्तार यांची माहिती

Hailstorm compensation| राज्यात गेल्या महिन्यात अवकाळी पावसानं दाणादाण उडवली होती. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातील सर्वच भागात पावसानं हजेरी लावली. त्यात फळबागा आणि अन्य शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं. नुकसान भरपाई कधी मिळणार यावर आता कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे. या नुकसानीचे २४ तासांत पंचनामे पूर्ण होतील आणि पुढील १० दिवसांत शेतकऱ्यांच्या मदतीची घोषणा शासनाकडून करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

काय म्हणाले अब्दुल सत्तार

छत्रपती संभाजीनगर येथील हिमायतबाग येथील कृषी विद्यापीठाच्या विज्ञान भवनात त्यांनी मतदार संघातील कामांच्या संदर्भात आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. अतिवृष्टी, परतीचा पाऊस आणि आता अवकाळी, गारपीट यामुळं सहा महिन्यात चाैथ्यांदा शेतीमालाचं नुकसान झालं आहे.
या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी ज्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला नाही, त्या जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावलं असल्याचं सत्तार म्हणाले. जवळपास 70 टक्के पंचनामे झाले आहेत आणि उर्वरित पंचनामे 24 तासात पूर्ण करण्यात येतील.

किती झालं नुकसान

या पत्रकार परिषदेदरम्यान अब्दुल सत्तार यांनी राज्यात किती नुकसान झालं आहे याबद्दलही माहिती दिली.
मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे राज्यात सुमारे 43 हजार हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालं आहे. मराठवाड्यातील 11 हजार 166 हेक्टरवर नुकसान झालं आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 5 हजार 956 हेक्टरवरील पिकाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्याचं सत्तार यांनी सांगितलं.

दहा दिवसात मिळणार नुकसान भरपाई

या पिकांच्या झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई कधी मिळणार याबद्दलही अब्दुल सत्तार यांनी या पत्रकार परिषदेत माहिती दिली. एन डी आर एफ च्या निकषापेक्षा अधिक मदत देणार असल्याचे त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर एनडीआरएफ निकषाच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय राज्यसरकारनं घेतला होता. तशीच मदत गारपिटीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.  या मदतीची घोषणा पुढील दहा दिवसात करण्यात येणार आहे असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button