ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Gram Panchayat Election | तुम्हालाही ग्रामपंचायतची निवडणूक लढून सरपंच व्हायचंय का? त्वरित जाणून घ्या पात्रता

Gram Panchayat Election | Do you also want to contest Gram Panchayat elections and become Sarpanch? Know Eligibility Instantly

Gram Panchayat Election | ग्रामपंचायत ही लोकशाहीचा पाया आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावांमध्ये विकासाचे कामे होतात. ग्रामपंचायत निवडणूक ही ग्रामस्थांच्यासाठी एक महत्त्वाची संधी(Gram Panchayat Election) असते. या निवडणुकीतून गावाचा विकास करण्यासाठी योग्य उमेदवार निवडला जातो.

ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराला काही पात्रता असणे आवश्यक आहे. या पात्रता खालीलप्रमाणे आहेत:

  • उमेदवाराचे वय 21 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
  • उमेदवाराचे नाव ग्रामपंचायतीच्या विद्यमान मतदार यादीमध्ये समाविष्ट असावे.
  • उमेदवारावर कोणत्याही कायद्यानुसार पात्रता अभावाची कारवाई झालेली नसावी.
  • उमेदवाराने किमान 7वी इयत्तेची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

वाचा : Gram Panchayat Election | निवडणूक आयोगाकडून राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा! ‘या’ तारखेला होणार मतदान

ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी काही व्यक्ती अपात्र आहेत. या अपात्रता खालीलप्रमाणे आहेत:

  • ज्या व्यक्तीस राज्य विधानमंडळाने कोणत्याही कायद्याद्वारे अपात्र ठरविले असेल.
  • ज्या व्यक्तीला मुंबई दारूबंदी अधिनियम, 1949 अन्वये दोषी ठरविले असेल व त्यानंतर पाच वर्षांचा कालावधी संपला नसेल.
  • ज्या व्यक्तीला इतर अपराधाबाबत न्यायालयाने दोषी ठरविले असेल व तिला 6 महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी कारावसाची शिक्षा झाली असेल व कारावासातून मुक्त झाल्यापासून पाच वर्षांचा कालावधी संपत नसेल.
  • ज्या व्यक्तीने शासन अथवा स्थानिक प्राधिकरणामध्ये कर्मचारी असेल.
  • ज्या व्यक्तीने शासन अथवा स्थानिक प्राधिकरणामध्ये कोणतेही पद धारण केले असून, तिला गैरवर्तणुकीबद्दल बडतर्फ करण्यात आले असेल.
  • ज्या व्यक्तीकडे ग्रामपंचायतीची, पंचायत समिती, जिल्हा परिषदेची कोणत्याही प्रकारची थकबाकी देय असेल.
  • जी व्यक्ती पंचायतीच्या नियंत्रणाखाली वेतनीपद किंवा लाभाचे पद धारण करीत असेल.
  • ज्या व्यक्तीने तिचा ग्रामपंचायतीच्या कामात, करारात, सेवेत स्वत: किंवा भागीदारामार्फत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सहभाग किंवा हितसंबंध असेल.
  • ज्या व्यक्तीने शासकीय जमिनीवर किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण केलेले असेल.
  • ज्या व्यक्तीस भारताच्या निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चाचा हिशेबाच्या मुद्यावरून अपात्र ठरविले असेल.
  • जी व्यक्ती परकीय राष्ट्राचे नागरिकत्व संपादन केलेली असेल.
  • जी व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य पदावरून आयुक्ताने दूर केले असेल.

खासगी नोट्स

  • 1 जानेवारी, 1995 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेली व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी पात्र आहे.
  • स्त्रियांसाठी आरक्षित जागांवर सर्व पात्र स्त्रिया अर्ज करू शकतात.
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय महाराष्ट्र राज्याबाहेरील इतर राज्यातून महाराष्ट्रामध्ये स्थलांतरीत झाले असल्यास त्या व्यक्तींनी ग्रामपंचायत निवडणुकामध्ये त्या जातीसाठी आरक्षित असलेल्या प्रभागातून नामनिर्देशनपत्र जरी दाखल केले असले तरी त्यांना निवडणूक लढविता येणार नाही.

हेही वाचा :

Web Title : Gram Panchayat Election | Do you also want to contest Gram Panchayat elections and become Sarpanch? Know Eligibility Instantly

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button