ताज्या बातम्या

Election Commission | ब्रेकींग! अजित पवार गटाचा राष्ट्रवादीवर दावा; निवडणूक आयोगाने दिली सुनावणी, जाणून घ्या सविस्तर

Breaking! Ajit Pawar group's claim on NCP; The Election Commission gave a hearing, know in detail

Election Commission | राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फुटीच्या प्रकरणी आज निवडणूक आयोगात पहिली सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गटाने आपापली बाजू मांडली. अजित पवार गटाने निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद करताना सांगितले की, त्यांच्याकडे आवश्यक संख्याबळ आहे. विधानसभेत 42 आमदार, विधान परिषदेत 6 आमदार, नागालँडमधील 7 आमदार आणि लोकसभेत आणि राज्यसभेत प्रत्येकी एक खासदार त्यांच्यासोबत आहेत.

निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद
अजित पवारांनी जयंत पाटील यांच्या नियुक्तीवरही आक्षेप घेतला आणि पक्ष घटनेचे पालन होत नसल्याचा आरोप केला. शरद पवार गटाने निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद करताना सांगितले की, पक्षावर अजित पवार यांचा गट दावा करू शकत नाही. पक्षाचे सर्वाधिकार शरद पवारांकडे आहेत. त्यांनी पक्षाचे चिन्ह गोठवू नका अशी विनंती केली.

वाचा : Gram Panchayat Election | निवडणूक आयोगाकडून राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा! ‘या’ तारखेला होणार मतदान

राष्ट्रवादीवरील फुटीचा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा
निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना बाजू मांडण्यासाठी पूर्णपणे संधी मिळेल अशी टिपण्णी केली. पुढील सुनावणी सोमवारी (९ ऑक्टोबर) रोजी होणार आहे. या सुनावणीमुळे राष्ट्रवादीवरील फुटीचा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय कोणत्या गटाला पक्ष आणि चिन्ह देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

Web Title: Breaking! Ajit Pawar group’s claim on NCP; The Election Commission gave a hearing, know in detail

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button