ताज्या बातम्या

Gram Panchayat Fund | ग्रामपंचायतींना तब्बल 56 कोटींचा निधी! ‘या’ कामांसाठी निधी होणार खर्च; जाणून घ्या सविस्तर

As much as 56 crore funds to Gram Panchayats! Expenditure to be funded for 'these' works; Know in detail

Gram Panchayat Fund | पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना 2023-24 या आर्थिक वर्षातील बंधित निधीचा पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातील 1226 ग्रामपंचायतींना 56 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. केंद्र शासनाकडून 15 व्या वित्त आयोगातून बंधित आणि अबंधित अशा दोन प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी दिला जातो. यात ग्रामपंचायतींना 80 टक्के, तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितींना 10-10 टक्के निधी वाटपाचे सूत्र ठरलेले आहे. त्यानुसार 2023-24 या आर्थिक वर्षातील बंधित निधीचा पहिला हप्ता नुकताच शासनाकडून प्राप्त झाला आहे

ग्रामपंचायतींना 56 कोटींचा निधी
जिल्ह्यात 1320 ग्रामपंचायती आहेत. मात्र यातील 94 ग्रामपंचायतींवर प्रशासक असल्याने त्या ग्रामपंचायतींना या निधीवाटपात तूर्त वगळण्यात आलेले आहेत. तसेच निवडणुका जाहीर झालेल्या आणि प्रशासक असलेल्या 194 ग्रामपंचायतींना आयोगाचा निधी मिळणार नाही. उर्वरित 1226 ग्रामपंचायतींनाच 56 कोटींचा निधी वाटला जाणार आहे.

वाचा : Gram Panchayat Election | निवडणूक आयोगाकडून राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा! ‘या’ तारखेला होणार मतदान

कोणती कामे होणार?
ग्रामपंचायतींना मिळालेल्या निधीचा वापर स्वच्छता आणि हागणदारीमुक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची देखभाल दुरुस्ती तसेच पेयजल, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर रिसायकलिंग यावर करणे बंधनकारक आहे. या कामांसाठी 50 टक्के निधी खर्च केला जाणार आहे. तसेच ही कामे झालेली असतील तर प्रशासनाच्या सूचनांनुसार पुढील कामे घेण्याचेही शासनाचे निर्देश आहेत. या निधीच्या प्राप्तीमुळे ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळेल आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या कार्यात अधिक सक्षम बनण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ग्रामीण भागातील विकासाला चालना
बंधित निधी म्हणजे तो निधी ज्याचा वापर विशिष्ट उद्देशासाठीच केला जाणे आवश्यक आहे.
स्वच्छता आणि हागणदारीमुक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची देखभाल दुरुस्ती ही एक महत्त्वाची बाब आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण मिळेल.
पेयजल, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि वॉटर रिसायकलिंग ही ग्रामीण भागातील पाणी समस्या सोडवण्यासाठी महत्त्वाची कामे आहेत.
या निधीच्या प्राप्तीमुळे ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळेल आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या कार्यात अधिक सक्षम बनण्यास मदत होईल.

हेही वाचा :

Web Title: As much as 56 crore funds to Gram Panchayats! Expenditure to be funded for ‘these’ works; Know in detail

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button