ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

NFBS | कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यु झाला असेल तर केंद्र सरकार करणार आर्थिक सहाय्य ; शासनाने सुरू केली ‘ही’ योजना

NFBS | घरातील कमावती व कर्ती व्यक्ती घराचा कणा असते. या व्यक्तीवर संपूर्ण कुटूंबाची आर्थिक जबाबदारी असते. दरम्यान याच घरच्या कर्त्या धर्त्या व्यक्तीचा मृत्यु झाला तर कुटूंबाची फार गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी केंद्र सरकारने एक योजना (Scheme) लागू केली आहे. अशा निराधार कुटुंबांना केंद्र सरकारतर्फे अशा २० हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

वाचा विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

नॅशनल फॅमिली बेनिफिट स्किम

या योजनेला ‘नॅशनल फॅमिली बेनिफिट स्किम’ म्हणजेच NFBS असे म्हटले जाते. घरातील कमवत्या व्यक्तीचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास निराधार झालेल्या कुटुंबाला या योजनेच्या माध्यमातून मदत मिळणार आहे. मग ती घरातील व्यक्ती पुरुष असो वा स्त्री ! महत्त्वाची बाब म्हणजे निधन झालेल्या व्यक्तीचे वय १८ ते ६० वर्षे वयोगटादरम्यान असेल तर कुटुंबाला या योजनेअंतर्गत मदत मिळेल. ( National Family Benifit Scheme)

Eligiblity | योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता

१) अर्ज करणारा व्यक्ती भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
२)कुटुंब दारिद्र्यरेषेच्या खाली असणं अपेक्षित आहे.
३) अर्ज करणारा व्यक्ती मृत व्यक्तीचा वारसदार असावा.

Appliction Process | अर्ज कसा करायचा ?
https://ap.meeseva.gov.in/DeptPortal/Application%20Forms%20New/District%20Admin-pdf/FORM%20OF%20APPLICATION%20CLAIMING%20FAMILY%20BENEFIT-NFBS.pdf या लिंक वर या योजनेचा ऑनलाइन अर्ज उपलब्ध आहे. हा अर्ज डाऊनलोड करून भरायचा असून तो जिल्हा सामाजिक कल्याण अधिकाऱ्याकडे जमा करावा लागेल.

वाचाखुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, ‘इतके’ दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

Important Documents | आवश्यक कागदपत्रे

१) ओळखपत्र
२) वास्तव्याचा पुरावा
३) आधार पॅन लिंक बँक अकाऊंट डिटेल्स
४)मोबाईल नंबर
५) आधार कार्ड
६) कुटुंबप्रमुखाचा वयाचा पुरावा
७) अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो
८) मृत्यूचा दाखला
९) ओळखपत्र किंवा आधार कार्ड
१०) वास्तव्याचा दाखला
११) पांढऱ्या रंगाचं रेशन कार्ड

Government announced new scheme which will give finantial help for supportless families

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button