Cotton Rate | सध्या बाजारात कापसाची विक्री सुरू आहे. तर देशामधील कापूस हंगाम सुरू होऊन जवळपास चार महिने उलटले आहे. पहिल्या तीन महिन्यांमध्ये कापसाच्या दरामध्ये (Cotton Rate) चढ उतार पाहायला मिळाला होता. यामुळे कापूस उत्पादक (Cotton Production) शेतकरी चिंतेत पडले होते. परंतु आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना (Department of Agriculture) दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कापूस तेजीमध्ये (Market Rate) आहे. याचा फायदा (Financial) देशामधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस तेजीत
मागील तीन महिने कापसाच्या दरात (Cotton Rate) चढ-उतार पाहायला मिळाले. परंतु, मागच्या महिन्यात कापसाचे दर दबावात होते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे (Cotton Market) दर तेजीमध्ये आहेत. याउलट देशातील बाजारपेठेत कापसाचे दर आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे सध्या देशातील कापूस उत्पादक शेतकरी निराश आहेत.
दरामुळे शेतकऱ्यांनी कापूस ठेवला दाबून
देशामधील बाजारात कापसाचे दर कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी (Agricultural Information) देखील कापसाची विक्री काही प्रमाणात थांबवली. म्हणजेच गरजेपुरता कापसाची विक्री केली. यामुळेच कापसाची आवक दीड लाखांहून आता एक लाखांवर आली आहे. तर दुसरीकडे कापूस वायदे देखील सुरू होणार आहेत. परंतु, असे असले तरी देखील कापसाचे दर अद्यापही दबावातच आहे.
कापसाच्या दरात होणार वाढ
तर सध्याचे कापूस जर पाहायला गेलं तर आज कापसाला सरासरी 8 हजार ते 8 हजार 500 रुपयांचा दर मिळत आहे. तरी देखील कापसाच्या दरात वाढ होण्याचा अंदाज आहे. ज्याचं कारण म्हणजे देशातून होणारी कापसाची निर्यात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात दरात असणारी तेजी. तर आगामी काळात कापूस 8 हजार 500 ते 9 हजार 500 रुपयांच्या दरम्यान वाढू शकतात. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- Agriculture | कृषी अवजारांचे यंत्र, तंत्र आणि मंत्र, जाणून घ्या खत टाकणीचे पारंपरिक यंत्र
- NASA | काय सांगता? चंद्रावरून आणलेल्या मातीत लावलं झाडं, ‘या’ मुळे घेण्यात आली चाचणी..
Web Title: Good news for cotton growers! Cotton booming in the international market, now will get ‘so much’ price