ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Family Card | राज्यातील ३० दशलक्षहून जास्त कुटूंबांना मिळणार नवीन ओळख ! ‘परिवार पहचान पत्र’ साठी सरकारने घेतला पुढाकार

Family Card |काही वर्षांपूर्वी भारत सरकारने ‘आधार कार्ड’ (Aadhar Card) हे नवीन ओळखपत्र सुरू केले होते. यामध्ये देशातील प्रत्येक व्यक्तीची सर्व वैयक्तिक माहिती असते. आपण सर्वजण हे आधारकार्ड आपले ओळखपत्र म्हणून वापरतो. दरम्यान आता राज्य सरकारकडून आपल्या संपूर्ण कुटुंबाचे सुद्धा ओळखपत्र तयार करण्यात येणार आहे.

परिवार पहचान पत्र

हरियाणा सरकारने (Hariyana Government) आपल्या राज्यात परिवार पहचान पत्र सुरू केले होते. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुद्धा अशाच प्रकारे प्रत्येक कुटुंबाचे ओळखपत्र (Identity Card) तयार केले जाणार आहे. यासाठी राज्यसरकारने तातडीने पाऊले उचलली आहेत.

कुटूंबाची माहिती सरकारकडे असणार

कुटूंबातील सर्व व्यक्तींना सरकारच्या कल्याणकारी योजनांचा पुरेपूर लाभ घेता यावा यासाठी परिवार पहचान पत्र फायदेशीर ठरणार आहे. असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. परिवार पहचान पत्र (PPP) अंतर्गत कुटूंबातील सर्व व्यक्तींची माहिती सरकारकडे असणार आहे.

30 दशलक्षाहून जास्त कुटूंबाचा डेटा

या योजनेची ब्ल्यू प्रिंट (Blue Print) तयार झाली असून लवकरच याची अंमलबजावणी सुद्धा करण्यात येणार आहे. राज्यातील काही मंत्री हरियाणा मध्ये खास या योजनेचा अभ्यास करण्यासाठी जाऊन आले आहेत. या योजनेमध्ये सरकारकडे राज्यातील 30 दशलक्षाहून जास्त कुटूंबाचा डेटा असणार आहे.

PPP मध्ये असणारी माहिती

१) वैयक्तिक माहिती – कुटुंबाच्या या ओळखपत्रात कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे, त्यांचे वय, शिक्षण, जात, राशन कार्ड, पॅन कार्ड, घर, संपत्ती याबाबत माहिती असणार आहे.

२) आर्थिक माहिती – तसेच शेती विषयक माहिती, आधार कार्ड, मतदार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, बँकेशी संबंधित माहिती, उत्पन्नाची माहिती यांचा देखील यामध्ये समावेश असणार आहे.

३) इतर माहिती – मोटार-कार आणि उत्पन्नाची संपूर्ण माहिती, सरकारी सुविधांचा लाभ घेत आहात की नाही, कर घेत आहात की नाही ही माहिती सुद्धा ओळखपत्रात असणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Governmnet announced about Parivar Pahchan Patra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button