योजना

Subsidy| फळबाग लागवड योजनेचा लवकरच नारळ फुटणार ! शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य ; अर्ज मागविण्यास झाली सुरुवात

Subsidy|सरकारने मध्यंतरी शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना जाहीर केल्या होत्या. यामध्ये (स्व.) भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा सुद्धा समावेश होता. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी (Subsidy) साहाय्य केले जाणार आहे. राज्यात शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन मिळावे व मोठ्या प्रमाणात फलोत्पादन व्हावे यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

वाचा: एका कुटुंबातील फक्त ‘एवढ्याच’ व्यक्ती घेऊ शकतात पीएम किसान योजनेचा लाभ, अन्यथा….

Eligiblity | कोणाला लाभ घेता येणार ?

१) फक्त वैयक्तिक शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
२) संस्थात्मक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.
३) अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्वतःच्या नावे सातबारा असणे आवश्यक आहे
४) सातबाऱ्यावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमतिपत्र आवश्यक राहील.
५) जमीन कूळ कायद्याखाली येत असल्यास किंवा सातबाऱ्यावर कुळाचे नाव असल्यास तर कुळाचे संमतिपत्र आवश्यक असणार आहे.

Subsidy | फळबाग लागवडीमध्ये या कामांसाठी मिळणार अनुदान

१) खड्डे खोदणे
२) कलमे, रोपे लागवड करणे
३) पीक संरक्षण
४) नांग्या भरणे
५) ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे

दरम्यान शेतकऱ्यांना खालील कामे स्वखर्चाने करावी लागणार आहेत.

१) फळबाग लागवडीसाठी जमीन तयार करणे
२) माती व शेणखत, सेंद्रिय खतमिश्रणाने खड्डे भरणे
३) रासायनिक खते देणे
४) आंतरमशागत करणे
५) काटेरी झाडांचे कुंपण करणे

पंधरा फळपिकांच्या लागवडीसाठी अर्थसहाय्य मिळणार

स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये जवळपास पंधरा फळपिकांच्या लागवडीसाठी अर्थसहाय्य केले आहे. या योजनेअंतर्गत फळबाग केलेल्या लाभार्थ्यांना तीन वर्षांत अनुदान देण्यात येणार आहे. ५०:३०:२० या प्रमाणात हे अनुदान दिले जाणार आहे. या योजनेबाबत अधिक माहिती घेण्यासाठी आणि योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ व कृषी अधिकारी कार्यलयास संपर्क साधावा.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Farmers will get finantial support for fruit farming by this governmemt scheme

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button