ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Multilevel Farming | काय सांगता? ‘या’ तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकरी एकाच शेतात घेऊ शकतात 4 पिके अन् लाखाचे होतील 5 लाख

Multilevel Farming | भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे भारतातील निम्म्याहून अधिक नागरिक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. आता बदलत्या आधुनिक युगात शेतीचे (Agriculture) गणित देखील बदलत आहे. म्हणजेच आता शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती (Agriculture in Maharashtra) करण्यासोबतच आधुनिक पद्धतीने देखील शेती करून बक्कळ नफा (Financial) कमावत आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर शेतकऱ्यांची शेती पूर्वीपेक्षा थोडी सोपी झाली आहे. तसेच नफ्यातही वाढ झाली आहे. असेच एक तंत्र म्हणजे बहुस्तरीय शेती (Multilevel Farming) ज्याचा अवलंब करून शेतकरी अल्पावधीतच श्रीमंत होतील.

बहुस्तरीय शेती म्हणजे काय?
एकाच वेळी आणि ठिकाणी 4 ते 5 पिके घेण्याची पद्धत बहुस्तरीय शेतीद्वारे केली जाते. यासाठी शेतकऱ्यांनी आधी जमिनीत असे पीक लावावे, जे जमिनीच्या आत उगवते. मग त्याच शेतात भाजीपाला आणि इतर झाडे लावता येतात. याशिवाय शेतकरी त्याच शेतात एखादे चांगले पीक व फळझाडे लावू शकतात.

वाचा: तुमच्याकडे ‘या’ टाटा समूहाच्या कंपनीचे शेअर्स आहेत का? एका तासात थेट 8 टक्क्यांहून अधिक मारली उंच उडी

कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर
कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी या तंत्राने शेती करणे खूप फायदेशीर ठरू शकते. एका पिकाला पाणी देऊन शेतकरी चार प्रकारची पिके घेऊ शकतात. असे केल्याने त्यांचा लागवडीचा खर्च कमी होईल आणि त्यांना जास्त जमीन ठेवण्याची गरज भासणार नाही. त्याचबरोबर या शेतीमध्ये जास्त पाण्याची आवश्यकता देखील भासत नाही. कारण एकदा पाणी दिल्यास 4 पिकांना एकदम पाणी मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना डबल पाणी द्यावे लागत नाही. त्यामुळे कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या पद्धतीने शेती करण्यावर भर द्यावा.

वाचा: बाप रे! 10 दिवसांनंतर पृथ्वीवर येणारं मोठं संकट, शास्त्रज्ञांनी दिलाय ‘हा’ धक्कादायक इशारा

बहुस्तरीय शेतीमध्ये खर्च आणि नफा
बहुस्तरीय शेतीचा खर्च खूपच कमी आहे. इतर पिकांच्या (Agricultural Information) त्याची किंमत सामान्यपेक्षा कमी आहे. तज्ज्ञांच्या मते, एका एकरात या तंत्राने शेती करण्यासाठी एका शेतकऱ्याला एक लाख रुपयांपर्यंत खर्च आला, तर त्यातून शेतकरी सहजपणे 5 लाख रुपयांपर्यंतचा नफा कमवू शकतात. म्हणूनच अशा पद्धतीने शेती करणे शेतकऱ्यांसाठी प्रचंड फायदेशीर आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: what do you say With the help of this technology farmers can grow 4 crops in one field and one lakh will become 5 lakhs

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button