ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Raju Shetti | मोठी बातमी: ‘या’ दिवशी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार – खासदार राजू शेट्टी..

Raju Shetti | राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेत आंदोलन करण्याबाबत भूमिका स्पष्ट केली. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान ( grant), सदोष वीज बिल (light bill)दुरुस्त करुन देणे, वीज नियामक मंडळाची प्रस्तावित 37 टक्के वीज वाढ रद्द करावी,ऊस तोडणी मुकादमांकडून होत असलेली ऊस वाहतूकदारांची होणारी फसवणूक, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे थकित अनुदान, यासह विविध प्रश्‍ंनाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

“ऊस तोडणी वाहतूकदरांचा प्रश्न गंभीर झाला आहे. ऊस उत्पादन आणि साखर कारखाने आणि त्यांची गाळप क्षमताही वाढली आहे, पण तोडणी मजुरांची संख्या कमी होत चालली आहे. याचा फायदा घेऊन तोडणी मुकादमांकडून वाहतूकदारांची मोठी फसवणूक झाली आहे. साखर आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार 22 जिल्ह्यामध्ये 446 कोटी रुपयांची मुकादमांनी फसवणूक केली आहे.”

Swabhimani Shetkari Sanghatana | स्वाभिमानी ऊस वाहतूकदार संघटना स्थापना

राज्य पातळीवरील स्वाभिमानी ऊस वाहतूकदार संघटनेची स्थापना करण्यात येणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. या संघटनेमार्फत ऊस तोडणी कल्याण महामंडळाकडून आता मजुरांची नोंदणी करुन कारखान्यांना मजूर पुरवावेत, वाहतूकदारांवर वेगवेगळे गुन्हे दाखल करताना स्थानिक पोलिसांनी सखोल चौकशी करावी, टोळ्या पळालेल्या वाहतूकदारांच्या मागचा बँकेचा ससेमिरा कमी करावा, हे कर्ज फेडण्यासाठी पाच वर्षांची मुदत द्यावी, आदी मागण्या करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

Not For career I am here for farmars | चंद्रशेखर राव यांची ऑफर राजू शेट्टींनी नाकारली


दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर राव (K.Chandrashekar Rao) यांनी राजू शेट्टी (Raju Shetti) यांना महाराष्ट्र सांभाळण्याची ऑफर दिली होती. पण राजू शेट्टी यांनी नम्रपणे ही ऑफर नाकारली आहे. आम्हाला आमच्या संघटनेचं अस्तित्व संपवायचं नाही. तसेच करिअर करण्यासाठी मी राजकारणात आलो नसून, शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आणून त्यासाठी लढा द्यायचा आहे, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी मांडली.


Chakka jam time| वेळ आणि महामार्ग बंद होणार नाही
बारावीच्या परीक्षा असल्याने दुपारी 12 वाजता आंदोलन करण्यात येणार असून राष्ट्रीय महामार्ग बंद केला जाणार नाही.राजू शेट्टी म्हणाले की, चक्काजाम आंदोलन राष्ट्रीय महामार्गावर होणार नसून तालुक्याच्या पातळीवरील राज्य आणि प्रमुख जिल्हा मार्ग रोखून धरले जातील.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button