ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Subsidy| खुशखबर ! शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर मिळणार जमीन ; जाणून घ्या, काय आहे योजना ?

Subsidy|सरकार लोकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असते. तळागाळातल्या लोकांपर्यंत सरकारी योजना Government Schemes) पोहोचाव्यात, त्या योजनांचा लोकांनी लाभ घ्यावा. यासाठी सरकार प्रयत्नशील असते. दरम्यान कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना ही सरकार कडून राबविण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजुरांसाठी ही योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत वरील लोकांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी अनुदान दिले जाते. तसेच उपक्रम राबविले जातात. २००४-०५ पासून ही योजना सुरू आहे. भूमिहीन कुटूंबातील लोकांना आर्थिक स्थैर्यता लाभावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती.

वाचा: अपात्र शेतकऱ्याच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचे कोट्यवधी रुपये जमा

१०० टक्के अनुदानावर मिळते जमीन

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेतून १०० टक्‍के अनुदानावर शेतजमीन उपलब्ध करून देण्यावर भर आहे. ऑगस्ट २०१८ पासून या योजनेअंतर्गत १०० टक्‍के अनुदानावर ( Land on 100% subcidy) पात्र लाभार्थ्यास शेतजमीन उपलब्ध करून दिली जाते. यामध्ये चार एकर जिरायती किंवा दोन एकर बागायत जमीन देण्यात येते.

२०२ शेतकऱ्यांना मिळाली ५७० एकर जमीन

या पार्श्वभूमीवर आतापर्यंत वर्धा (Wardha) जिल्ह्यातील २०२ शेतकऱ्यांना ५७० एकर शेतजमिनीचे (Agriculture Land) वाटप करण्यात आले आहे. २०२१-२२ मध्ये आर्वी व आष्ट्री तालुक्‍यात जमीन वाटप झाले होते. त्यावेळी ३६ एकर जिरायती व ८१ एकर बागायती जमीन ४६ लाभार्थ्यांना दिली गेली होती. यावर्षीसाठी सुद्धा वाटपासाठी जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू आहे.

Eligibility | पात्रता

१) या योजनेच्या लाभासाठी व्यक्‍ती हा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावा.
२) महत्त्वाची बाब म्हणजे लाभ घेणारा व्यक्ती दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर असणे आवश्‍यक आहे.
३) विधवा आणि परितक्‍त्या महिलांना या योजने प्राधान्य दिले जाते.
४) लाभार्थी १८ ते ६० वर्ष वयोगटातील असणे आवश्‍यक आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Farmers from backword communities get Agriculture land on 100% subcidy by government

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button