ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

सौर ऊर्जा प्रकल्पामधून शेतकरी घरी बसून कमाई करू शकतात, हे आहेत सोप्पे दोन पर्याय..

Farmers can earn money from solar energy projects at home, these are two easy options.

शेतकऱ्यांना (farmers) त्यांच्या नापीक आणि आकृषिक जमिनीचा वापर करून उत्पन्न घेता येईल या हेतूने पंतप्रधान कुसुम योजना (घटक अ) केंद्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली आहे. सौर ऊर्जा प्रकल्पात (Solar power project) शेतकरी (farmers) निर्माण होणारी वीज महावितरणाला विकून पैसे कमवू शकतात. यासोबत सौर प्रकल्पासाठी (Solar power project) जमीन भाडेपट्टीवर देऊनही शेतकऱ्यांचे (farmers) घरी बसून उत्पन्न मिळवू शकतात. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना (farmers) लाभ घेण्यासाठी आवाहन केले आहे.

वाचा –

हे लोक सौर ऊर्जा प्रकल्प उभा करू शकतात –

सौर ऊर्जा प्रकल्प (Solar power project) शेतकरी, शेतकरी संस्था, पंचायत, शेतकरी उत्पादक संस्था तसेच पाणी वापरकर्ता संघटना हे सौरऊर्जा प्रकल्प (Solar power project) उभारू शकतात. यांच्यासाठी कोणतेही आर्थिक निकष ठेवलेले नाहीत.

विकासक आणि जमीन मालक यांच्यात भाडेपट्टा करार केला जाईल. त्या भाडेपट्टी कराराद्वारे जमीन मालकाला त्यांच्या जमिनीचे भाडे मिळणार आहे. या योजनेत शेतकरी त्यांच्या बँक खात्यात विकासकाद्वारे जमिनीचे मिळणारे भाडे हे महावितरणमार्फत जमा करण्याचा पर्याय निवडू शकतात. हा सौरऊर्जा प्रकल्प महावितरणच्या जवळच्या ३३/११ के. व्ही. उपकेंद्राशी थेट जोडला जाणार.

वाचा –

विकासकाला या योजनेअंतर्गत भाग घेण्यासाठी बयाणा रक्कम (ईएमडी) १ लाख रुपये मेगावॉट, परफॉर्मन्स बँक गॅरंटी (पीबीजी) पाच लाख रुपये मेगावॉट, उद्देशीय पत्र जारी केल्यापासून १२ महिन्यांच्या आत सौरऊर्जा प्रकल्प (Solar power project) कार्यान्वित करणे बंधनकारक असणार आहे.

शेवटची तारीख 6 डिसेंबर –

वीज खरेदी करार प्रकल्प कार्यान्वित झालेल्या तारखेपासून २५ वर्षांसाठी ३.१० रुपये प्रतियुनिट दराने राहील. या योजनेअंतर्गत महावितरणने ४४४ मेगावॉटसाठी निविदा जाहीर केल्या आहेत. निविदा भरण्याची शेवटची तारीख ६ डिसेंबर ठेवण्यात आली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button