ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Fertilizers | शेतकऱ्यांनो बोगस खतांपासून रहा सावध! राज्यातील ‘या’ कंपन्यांकडून केली जातेय बोगस खतांची निर्मिती

सध्या खरीप हंगाम (Kharif season) सुरू आहे. याचमुळे शेतकरी खते आणि बियाण्याची मोठ्या प्रमाणात खरेदी (Buy fertilizer seeds)करत आहेत. तर काही शेतकऱ्यांची खरेदी अद्याप झालेली नाही.

Fertilizers | कोणताही हंगाम (Season) सुरू व्हायचं म्हटलं की, खतांच्या आणि बियाणांच्या दरातील वाढ ही ठरलेलीच असते. त्याचप्रमाणे आता खरिपाची पेरणीला (Kharif season sowing) सुरुवात होताच खते आणि बियाणांच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता खिसा गरमच ठेवावा लागणार आहे. तर अशातच शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी वाढ होत आहे. आता खतांच्या काही कंपन्या बोगस खतांची निर्मिती करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

कंपन्यांवर गुन्हे दाखल
ऐन खरिपात महराष्ट्रातील 6 कंपन्या बोगस खतांची निर्मिती करत आहेत. कृषी विभागातील काही अधिकाऱ्यांच्या मदतीने महाराष्ट्रातील 6 खत कंपन्या या. बोगस खतांची निर्मिती करत आहेत. त्याचवेळी आता या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश केंद्राने राज्याला दिले आहे.

वाचाCrop Insurance | महाराष्ट्रात पंतप्रधान पीक विमा योजनेत बदल, नव्या पॅटर्नचा शेतकऱ्यांना होणार फायदा?

कोणत्या आहेत या 6 कंपन्या?
महाराष्ट्रात या बोगस खतांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची नावे उघड झाली आहेत. ज्यात लोकमंगल कंपनी, तसेच येथीलच वसंत अग्रो टेक, नागपूरातील विदर्भ मार्केटींग फेडरेशन, कोल्हापुरातील शेतकरी सहकारी संघ, औरंगाबाद येथील देवगिरी फर्टिलायझर या कंपन्यांचा समावेश आहे. आता या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

वाचाWheat | असं काय झालं की तुर्कीने थेट भारताचा गहू नाकारला? जाणून घ्या कारण…

खरिपासाठी खते आवश्यक
शेतकरी खरीप हंगामात उत्पादन जास्त निघावे यासाठी रासायनिक खतांचा वापर करतात. त्यामुळे आता खरिपाच्या तोंडावर शेतकरी बियाणे आणि खतांची खरेदी करत आहेत. मात्र, अशातच आता या कंपन्यांकडून बोगस खतांची निर्मिती करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी खतांची पारखून खरेदी करणे आवश्यक आहे. आता या बोगस खतांची निर्मिती करणाऱ्या या कंपन्यांवर काय कारवाई करण्यात येईल हे पाहणं महत्वाचं ठरेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button