
कांद्यासाठी प्रसिद्ध असणारी लासलगाव (Lasalgaon) बाजार समितीमध्ये कांद्याची (Of onions) शंभर रुपयांनी घसरण पाहण्यास मिळाली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या( farmers) चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक बाजार समित्या (Market Committees) बंद होत्या त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
अनेक संकटांचा सामना करतच कांद्याचे उत्पादनातून काहीतरी रक्कम हाती येईल अशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आशा होती परंतु त्यांच्या आशेवर पाणी फिरताना दिसत आहे. नाफेडकडून ( Nafed) कांदा खरेदी करण्यासाठी एक महिना उशीर लागला असून, नाफेडचे 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले, त्यामुळे 1 ऑगस्ट पासून कांदा खरेदी बंद झाली असल्याकारणाने ही घसरण (Falling) पाहण्यास मिळत आहे.
वाचा : ऑगस्ट महिन्यापासून नव्या स्वरूपात मिळणार सातबारा, खोट्या नोंदणीला बसणार आळा..
वाचा : Pearl farming: दर महिन्याला तीन लाख रुपये हवेत मग करा ‘मोत्याची शेती’..
जेव्हा नाफेडकडून कांदा खरेदी केली जात असताना, कांद्याचा बाजारभाव प्रति क्विंटल 1750 इतका होता मात्र चार-पाच दिवसात तो शंभर रुपये घसरला असल्याने भविष्यात अजून कांद्याच्या दरामध्ये घसरण पाहण्यास मिळेल का अशी चिंता शेतकऱ्यांना चिंता वाटत आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा :