ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

शेतकरी मित्रांनो “हे” प्रशिक्षण घ्या, जोड व्यवसायातून मिळेल तब्बल ५० % जास्त नफा…

Farmer friends, take "this" training, you will get 50% more profit from joint venture.

पुणे : शेतकरी आर्थिक उपन्न वाढावे यासाठी शेतीसोबत पशुपालनासारखे जोडव्यवसाय करत असतात. यातून त्यांना थोडाफार नफा (Profit) ही मिळतो, परंतु शेतकऱ्यांना याव्यवसायातून अधिक नफा कमावता यावा या उद्देशाने आता राज्यातील दूध उत्पादन शेतकऱ्यांना व्यवसायिक अंगाने दुग्धजन्य पदार्थनिर्मितीचे प्रशिक्षण देण्यात येणार असून यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पुढाकार (Initiative) घेतला आहे.

वाचा – शेतकरी मित्रांनो, आता शेतीतील कामे होणार झटपट; ACE कंपनीचा नवीन ट्रॅक्टर बाजारात..

म्हणून उभारले जाणार प्रशिक्षण केंद्र

शेतकऱ्यांनी फक्त दूध उत्पादीत करणे व खासगी किंवा सहकारी दूध प्रकल्पांना पुरविणे अशी मर्यादित भूमिका न ठेवता त्यांनी देखील दूध प्रक्रिया व दुग्धजन्य पदार्थ (milk processing and dairy products) निर्मितीतही पुढे यावे यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना हे व्यवसायिक प्रशिक्षण मिळाल्यास त्यांच्या उत्पन्नात ३० ते ५० टक्क्यांपर्यंत जादा नफा मिळू शकतो.

वाचा – हा’ आहे संक्रांतीच्या पूजेचा योग्य मुहूर्त; भारतात इथे साजरी केली जाते मकर संक्रांत..

राहुरी विद्यापीठाने घेतलाय पुढाकार

राज्यसरकारने (State goverment) याआधीच यावर उपाययोजना करणे किंवा प्रशिक्षण केंद्र उभारणे गरजेचे होते परंतु आता या कामासाठी राहुरी विद्यापीठाने पुढाकार घेतला असून या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या नगर, पुणे व कोल्हापूर जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा विद्यापीठाने निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिले प्रशिक्षण केंद्र कोल्हापूरला उभारले जाण्याची शक्यता जास्त आहे. यासाठी विद्यापीठाकडून विशेष निधीही(Fund) मंजूर करण्यात आला असून शासनाने देखील यात लक्ष घालणे गरजेचे आहे.

हे ही वाचा –

नागरिकांनो, घरच्या घरी कंपोस्ट पिट बनवा व मिळवा ५० % अनुदान…

प्रचंड नफा मिळवून देणाऱ्या या शेतीबद्दल तुम्हाला माहित आहे का? केंद्रसरकारकडूनही मिळते आर्थिक मदत…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button