ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
पशुसंवर्धन

शेतकरी मित्रांनो, ही प्रक्रिया करा! जनावरांसाठी 12 महिने चारा राहील हिरवागार…

Farmer friends, do this process! Fodder for animals will remain green for 12 months

जनावरांसाठी हिरवा चारा शारीरिक दृष्ट्या महत्वाचा (Important) असतो. खासकरून जर शेतकरी दुधव्यवसाय (Dairy business) करत असतील तर दुध देणाऱ्या जनावरांना हिरवा चारा लागतोच. त्याने दूध वाढण्यास मदत होते. पण शेतकरी बाराही महिने हिरवा चारा साठवून ठेऊ शकत नाहीत. पण आता हे देखील शक्य आहे. यासाठी मुरघास (Silage) हा उपाय आहे.

वाचा –

कापसाच्या दरात विक्रमी वाढ! दोन दिवसांत कापसाचे वाढले दर, काय आहेत दर पहा सविस्तर..

मुरघास कशाला म्हणावा –

हिरवा चारा कापुन तो एका बंद खड्ड्यात दोन महिने (Two month) ठेवला जातो. अशा ठिकाणी जिथे याला हवा लागणार नाही. यानंतर या चाऱ्यात रासायनिक (Chemical) प्रक्रिया घडवून चारा आंबूस आणि चवीला देखील चांगला बनतो याला मुरघास म्हणतात.

याप्रकारे करा मुरघसासाठी खड्डा-

खड्डा घेताना उंचावरील जागेवर घ्यावा आणि पाण्याचा (Water) निचरा होणाऱ्या टणक जागेवर घ्यावा. खड्ड्यांच्या भिंती सरळ, गुळगुळीत आणि शक्य असल्यास आतल्या बाजूने सिमेंट प्लॅस्टर केल्यास मजबुत होते. खड्ड्याची उंची रुंदीपेक्षा जास्त असावी.
मिरघासाचा खड्डा भरवण्यासाठी हिरव्या चाऱ्याची योग्य प्रमाणात कुटी मशीनने कुटी करावी. मूरघासची पौष्टिकता (Nutrition) वाढविण्यासाठी 2 टक्के युरीयाचे द्रावण करून प्रत्येक थरावर फवारावे. हे सगळ झाल्यानंतर खड्डा हवाबंद (Airtight) ठेवावा.

मुरघासचे फायदे (benefits of silage)-

१) हिरवा चारा नसल्यास मुरघास जनावरांना घालू शकतो.
२) कमी जागेमध्ये जास्त चारा होतो.
३) मुरघास कोणत्या पण ऋतू मध्ये बनवता येते फक्त चार उपलब्ध पाहिजे.
४) मुसघासाने दुभत्या जनावरांचे दूध (Milk) वाढण्यास मदत होते आणि जनावरांचे आरोग्य चांगले राहते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button