ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Agricultural Electricity | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता शेतीसाठी मिळणार थेट दिवसा वीज, वाचा उपमुख्यमंत्र्यांची घोषणा…

Agricultural Electricity | केंद्र व राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या विविध अडचणींवर चर्चा करून त्यावर योग्य तो निर्णय घेत असतात. शेतकऱ्यांची वीज समस्या (Maharashtra Agriculture Power Problem), महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती (maharashtra rain conditions)आणि एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा या मुद्द्यांवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्याचवेळी उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा आणि उपयुक्त ठरणाऱ्या विजेसंदर्भात चर्चा केली. आता शेतकऱ्यांना दिवसा वीज (Electricity) मिळणार (Day power supply for agriculture) असल्याचं देवेंद्र फडवीसवीसांनी सांगितलं.

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी…
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी जी वीज मिळते त्यात शेती करणे सोपे नाही,” असा मानस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता. त्यांच्याकडे दिवसा वीज असावी. म्हणूनच आम्ही ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ तयार केली आहे. त्याअंतर्गत कृषी फीडर सोलरवर आणण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे महावितरणचे पैसेही वाचणार असून, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे. 2018-19 मध्ये आम्ही यासाठी पायलट प्रोजेक्ट केला होता तो यशस्वी झाला.”

ऍग्रीफीडर सौरऊर्जा
फडणवीस म्हणाले की, “आता फास्टट्रॅक करून येत्या वर्षभरात 30 टक्के ऍग्रीफीडर सौरऊर्जेवर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासोबतच आमच्या उपसा सिंचन योजनाही सौरऊर्जेवर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच वीजबिल न भरल्यामुळे पथदिवे तुटलेले किंवा पाण्याचे कनेक्शन तोडण्यात आलेल्या ग्रामपंचायती आहेत. आज आम्ही शासनाकडे थकीत असलेली संपूर्ण रक्कम शासनामार्फत भरावी यासाठी आराखडा तयार केला आहे. यासोबतच विद्युत विभागासोबत विविध गोष्टींची पाहणी केली आहे.”

पावसामुळे नुकसान झालेल्या तातडीने मदत
महाराष्ट्रातील पावसाबाबत फडणीस म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी तात्काळ घोषणा केली की, अशा प्रकारे कुठे जास्त पाऊस झाला आहे, तेथे तातडीने सर्वेक्षण करून अहवाल द्यावा. त्यांना जी काही तातडीची मदत लागेल ती दिली पाहिजे. तसेच कुठेही मृत्यू झाल्यास त्यांना तातडीने भरपाई देण्यात यावी.” एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मुर्मूजींना देशभरातून पाठिंबा मिळत असून बिगर एनडीए पक्षही पाठिंबा देत असल्याचे फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button