ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Drought Decision | दुष्काळसदृश परिस्थितीमुळे या शेतकऱ्यांना वनहद्दीतील गवत कापण्याची परवानगी

Drought Decision | Due to drought-like conditions, these farmers are allowed to cut grass in the forest area


Drought Decision | यंदा पर्यन्यमान कमी असल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पाळीव जनावरांना चाऱ्याची कमतरता भासण्याची शक्यता आहे. (Drought Decision)या पार्श्वभूमीवर भोर वनविभागाने त्यांच्या हद्दीतील गवत कापून नेण्याची मुभा शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

वनसंपत्तीला कोणतीही इजा न करता शेतकऱ्यांनी वनविभागातील गवत कापून घेऊन जावे, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

वाचा : Grass | दुधाचे प्रमाण अन् चाऱ्याची चिंता मिटवायचीये? तर ‘या’ गवताची लागवड करून 5 वर्षे समस्येतून मिळवा सुटका

वनविभागाच्या बैठकीत वनवणव्यांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात आल्या. वनहद्दीत जाळपट्टे तयार करणे, वणवे नियंत्रणासाठी पथक तयार करणे, वणव्यामुळे होणाऱ्या नैसर्गिक नुकसानीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे, या उपाययोजनांना मान्यता देण्यात आली.

या बैठकीत दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या गुरांना चारा कमी मिळणार असल्याचे निदर्शनास आले. यामुळे वनहद्दीतील चारा उपलब्ध करून दिल्यास दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांना मदत होऊ शकेल, असा निर्णय घेण्यात आला. तसेच प्रत्यक्ष जनावरांना वनहद्दीत चारण्यासाठी न आणता गुरांसाठी वनहद्दीतील गवत नेण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वनविभागाच्या या निर्णयामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वनविभागाच्या निर्णयाचे स्वागत

शेतकऱ्यांच्या संघटनांचाही या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गुरांचे चारे नियोजन करणे सोपे होणार आहे, असे संघटनांनी म्हटले आहे.

Web Title : Drought Decision | Due to drought-like conditions, these farmers are allowed to cut grass in the forest area

हेही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button